30 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeलातूरकेजीएन टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटलमध्ये वर्ल्ड ‘आयव्हीएफ डे’ साजरा

केजीएन टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटलमध्ये वर्ल्ड ‘आयव्हीएफ डे’ साजरा

लातूर : प्रतिनिधी
येथील नामांकित के. जी. एन. टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटलमध्ये दि. २५ जुलै रोजी वर्ल्ड ‘आयव्हीएफ डे’उत्साहात व भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जन्माला आलेल्या टेस्ट ट्युब बाळांची खास उपस्थिती हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.
या कार्यक्रमाचे आयोजन फर्टिलिटी सुपर स्पेशालिस्ट डॉ. आमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी हॉस्पिटलच्या गेल्या अनेक वर्षांच्या यशस्वी आयव्हीएफ प्रवासाचा आढावा सादर करण्यात आला. डॉ. शेख यांनी सांगितले की, ‘आजपर्यंत १५ हजाराहून अधिक टेस्ट ट्युब बाळांचा यशस्वी जन्म घडवण्यात के. जी. एन. हॉस्पिटलला यश मिळाले आहे. ही आमच्यासाठी एक सामाजिक आणि वैद्यकीय जबाबदारी आहे.
कार्यक्रमात आयव्हीएफ उपचारांद्वारे आई-वडील बनलेल्या पालकांनी आपल्या भावना व्यक्त करत हॉस्पिटलचे मनापासून आभार मानले. त्यानंतर डॉक्टर, नर्सेस आणि पालकांच्या उपस्थितीत टेस्ट ट्युब बाळांसह केक कापून वर्ल्ड ‘आयव्हीएफ डे’ चा उत्सव साजरा करण्यात आला. या भावस्पर्शी क्षणात अनेक कुटुंबांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. उपस्थितांनी के. जी. एन. हॉस्पिटलला ‘दुस-या संधीचे देणारे ठिकाण’ म्हणून संबोधले. लातूरमधील के. जी. एन. टेस्ट ‘आयव्हीएफ डे’ बेबी हॉस्पिटलने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, ही केवळ वैद्यकीय उपचारांची जागा नसून रुग्णांसाठी माहेरसारखं प्रेमळ घर आहे. येथे उपचार घेत असलेल्या एका गर्भवती रुग्णासाठी हॉस्पिटलमध्येच डोहाळे जेवणाचा हृदयस्पर्शी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
फुलांची सजावट, पारंपरिक खेळ, गोडधोड जेवण, सुंदर गाणी आणि रुग्णांसाठी खास साडी शृंगार या सा-या गोष्टींनी वातावरण अगदी घरासारखं झालं. हॉस्पिटलचा स्टाफ, नर्सेस आणि इतर रुग्ण यांचाही मोठा सहभाग लाभला. उपस्थितांनी रुग्णाच्या चेह-यावर हास्य फुलवण्यासाठी विशेष प्रयत्न  केले. अनेकांनी यावेळी भावनिक प्रतिक्रिया देत सांगितलं की, के. जी. एन. हॉस्पिटल खरंच आमचं दुसरं माहेर आहे! कार्यक्रमात डॉक्टरांनीदेखील शुभेच्छा देत तिच्या सुरक्षित प्रसूतीसाठी शुभेच्छा दिल्या. हा क्षण केवळ वैद्यकीय दृष्टिकोनातून नाही, तर मानवी जिव्हाळ्याचा उत्कृष्ट नमुना ठरला. के. जी. एन. टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटल, लातूर मातृत्वाच्या प्रवासात प्रत्येक रुग्णाला एक आपुलकीचा, आधाराचा आणि प्रेमाचा स्पर्श देण्यासाठी नेहमीच तत्पर आहे. कार्यक्रमाचा समारोप करताना डॉ. आमीर शेख यांनी सांगितले की,  के. जी. एन. टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटल आयव्हीएफच्या माध्यमातून मातृत्वाचे स्वप्न पाहणा-या प्रत्येक दाम्पत्याच्या पाठीशी आजही आणि उद्याही उभे राहील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR