23.9 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeमहाराष्ट्रकैद्यांनी बनविल्या ५०१ गणेश मूर्ती

कैद्यांनी बनविल्या ५०१ गणेश मूर्ती

धुळे कारागृह प्रशासनाचा उपक्रम

धुळे : प्रतिनिधी
गणेशोत्सव आता काही दिवसांवर आला आहे. यामुळे गणेश मूर्ती साकारण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यानुसार धुळे कारागृहात असलेले कैदी देखील सुबक मूर्ती साकारत असून यंदा धुळेकरांच्या घरात धुळे मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी बनविलेले बाप्पा विराजमान होणार आहेत.
गणपती बाप्पांच्या आगमनाची चाहूल आता सर्वत्र जाणवू लागली आहे.

धुळ्यात देखील कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेले दहा कैदी हे या मूर्ती बनविण्याच्या कामात जुंपले आहेत. गेल्या वर्षी देखील कारागृह प्रशासनातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाला धुळेकर गणेशभक्तांनी चांगला प्रतिसाद देखील दिला होता. त्यामुळे यंदा देखील कारागृह प्रशासनातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

कारागृहातील या कैद्यांनी २१ प्रकारच्या गणपती बाप्पाच्या सुबक अशा जवळपास ५०१ मूर्ती बनविल्या आहेत. त्यात लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई गणपती, गरुडावर विराजमान गणपती, बालगणेश, फेटा घातलेले गणेश अशा मूर्ती बनविल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व मूर्ती पर्यावरणपूरक असून शाडू मातीच्या सहाय्याने या सर्व मूर्ती बनविण्यात आल्या आहेत. या मूर्ती कारागृह प्रशासनातर्फे बाजारात विकण्यात देखील येणार आहेत. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदिवानांच्या हाताला काम मिळावे, त्यांना दोन पैसे पदरात पडावेत, या उद्देशाने कारागृह प्रशासनातर्फे हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR