18.3 C
Latur
Friday, November 8, 2024
Homeकॉँग्रेसचा फॉर्म्युला विधानसभेतही नेत्रदीपक कामगिरी करेल : गांधी

कॉँग्रेसचा फॉर्म्युला विधानसभेतही नेत्रदीपक कामगिरी करेल : गांधी

कोल्हापूर : वृत्तसंस्था
हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपतानाच महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपच्या नेतृत्वात राज्यात महायुती सत्ता टिकवण्यासाठी धडपडत आहे, तर काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहे. हरियाणा, जम्मू काश्मीरनंतर आता काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे.

राहुल गांधी २ दिवसीय कोल्हापूर दौ-यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. त्यानंतर शनिवारी संविधान बचाओ संमेलनाचे आयोजन करून राज्यात सामाजिक न्याय अजेंडा सेट करण्याची रणनीती आखतील.

महाराष्ट्राच्या निवडणुका कुठल्याही क्षणी घोषित होऊ शकतात. त्यामुळे राहुल गांधी शुक्रवारपासून महाराष्ट्राच्या निवडणूक मैदानात उतरत आहेत. राहुल गांधींनी निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा करण्यासाठी सामाजिक न्यायाची भूमी कोल्हापूर निवडले आहे. याठिकाणी काँग्रेस पुन्हा त्यांची ताकद दाखविण्यासाठी तयार आहे.

राहुल गांधी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यावरून वाढवावी अशी मागणी करत आहेत. त्यात कोल्हापूरसारखे शहर त्यांनी निवडले जिथे छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचा आवाज देत सर्वप्रथम आरक्षण दिले होते.

काँग्रेसने ज्या फॉर्म्युल्यावर २०२४ ची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात जिंकली त्यात पक्षाला १३ आणि मित्रपक्षांना १७ जागा जिंकता आल्या. या निकालाने भाजपला मोठा फटका बसला.

महाराष्ट्रात सर्वाधिक ३० टक्के लोकसंख्या मराठा समाजाची आहे. त्यानंतर दलित-मुस्लीम ११-११ टक्के आहेत. ओबीसींची संख्या ४० टक्क्यांच्या आसपास आहे. जी वेगवेगळ्या पक्षासोबत विभागली गेली आहे. महाराष्ट्रात ब्राह्मण समाज ६-८ टक्के आहे. विदर्भात दलित, मराठवाड्यात मराठा मतदार विधानसभा निवडणुकीच्या मतदानात निर्णायक भूमिका निभावणार आहेत. राज्यात काँग्रेसने दलित, मराठा, मुस्लीम मतांचा आधार घेत राजकीय रणनीती आखली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR