कॉंग्रेसचेही आता दिल्लीत आंदोलन

खासदार, आमदारांसह वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत हजर होण्याचे आवाहन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली, मुंबईसह देशात सीजेपीच्या आंदोलनाने आजचा दिवस गाजला. या अगोदरच इंडिया आघाडीने निवडणूक आयुक्त आणि केंद्र सरकारविरोधात आंदोलन करून चार दिवस दिल्लीचे वातावरण तापविले. त्यातच आज सीजेपीने जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. परंतु आज राजधानी दिल्लीत सर्वत्र धरपकड केली. यामुळे विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यातच आता कॉंग्रेसनेही मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू केली असून, आमदार, खासदारांसह वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे.

काँग्रेसकडून राज्यात आणि दिल्लीत सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करण्याची तयारी सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशातील काँग्रेसच्या सर्व आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उद्या संध्याकाळपर्यंत सर्वच आमदार-खासदारांनी दिल्लीत उपस्थित राहावे, असे निर्देश पक्षनेतृत्वाने दिले आहेत. विशेष म्हणजे केवळ महाराष्ट्रच नाही, तर सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांनाही दिल्लीत उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काळात काँग्रसह इंडिया आघाडीचे सरकारविरोधात मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.

इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटविण्याच्या मागणीसाठी राजधानी दिल्लीत सलग चार दिवस जोरदार आंदोलन केले. तसेच पोलिसांनी रोखताच जागेवरच ठिय्या आंदोलन करून दिल्लीचे वातावरण तापविले. रोजच ठिय्या आंदोलन करतानाच काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन मतचोरीचा मुद्दा मांडत ज्ञानेश कुमार यांना हटविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते. दरम्यान, आता कॉंग्रेसने देशात या विरोधात रान उठविण्याचे ठरविले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्यांतील नेत्यांनाही दिल्लीत येण्याचे निर्देश दिले आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded News | रोहित पवारांवर गुन्हा दाखल करा; भाजपाची पोलिसांकडे मागणी, महापौरांचे निवेदन
02:37
Video thumbnail
Latur News | समान काम समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; न्यायालयीन कामकाज ठप्प
05:22
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
LIVE - आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी शॉपच उद्घाटन
00:00
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42
Video thumbnail
Election Update|लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
04:13
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07

Latest news