कॉंग्रेस पक्षाचा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला

शेतक-यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या, संपूर्ण कर्जमाफी करा
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने पुकारण्यात आलेल्या जनआक्रोश दुष्काळ मोर्चाला शेतक-यांनी प्रचंड गर्दी केली होती. हा मोर्चा पैठण गेटपासून निघाला आणि विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत बोलताना कॉंग्रेसच्या नेत्यांनी गेंड्याची कातडी असलेल्या महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करीत भीषण दुष्काळात होरपळणा-या शेतक-यांना कोणत्याही परिस्थितीत हेक्टरी १ लाख रुपयांची मदत तातडीने मिळाली पाहिजे आणि शेतक-यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी ठासून मांडण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर येथे आज कॉंग्रेस पक्षाचे प्रभार डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह मराठवाड्यातील कॉंग्रेसचे खा. कल्याण काळे, खा. रवींद्र चव्हाण, खा. डॉ. शिवाजी काळगे यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांसाठी हा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला राज्यातील प्रदेश पदाधिकारी, मराठवाड्यातील पक्षाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लातूर जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने संभाजीनगर येथे मोर्चात सहभागी झाले होते.
महाराष्ट्रातील शेतकरी यावर्षी भीषण दुष्काळात होरपळत आहे. हे संकट खूप मोठे आहे. पण शेतक-यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या वेदनेचा आवाज सरकारच्या कानावर पडत नाही. शेतक-यांसाठी सरकार काहीच करीत नाही, अशा शब्दांत महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी टीकास्त्र सोडले.

दुष्काळाची दाहकता प्रचंड आहे. खरीप हंगाम वाया गेला. आता रबी हंगामातून हाती काही लागेल, असे वाटत नाही. मराठवाड्यातील स्थिती तर अत्यंत वाईट आहे. शेतक-यांबरोबर शेतमजूरही संकटात आहे. चारा, पाण्याची परिस्थिती कठीण आहे. पिण्याचे पाणी नाही. त्यामुळे शेतक-यांना तातडीने मदत झाली पाहिजे. कोरडवाहू शेतीला हेक्टरी किती मदत देणार, बागायतीला किती मदत देणार हे सांगा, अशी विचारणा कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतक-यांचे पीक पूर्णपणे वाळून गेले आहे. त्यामुळे शेतकरी अभूतपूर्व संकटात सापडला आहे. पण महाराष्ट्राचे जे सुलतान आहेत, ते देवेंद्र फडणवीस बेफिकीर राहून भ्रष्टाचाराच्या नादी लागले आहेत. अशा या कुंभकर्णाला आता सर्वांनी मिळून झोपेतून जागे करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत हल्लाबोल केला. यावेळी खा. कल्याण काळे, खा. रवींद्र चव्हाण, खा. डॉ. शिवाजी काळगे यांचीही जोरदार भाषणे झाली. या नेत्यांनी राज्य सरकारच्या नाकर्तेपणावर जोरदार हल्लाबोल केला आणि भीषण दुष्काळात होरपळणा-या शेतक-यांना भरघोस मदत झाली पाहिजे, अशी मागणी केली.

जनतेचा आवाज
ऐकून घेत नाही
देशातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुतीचे सरकार सर्वसामान्य जनता, शेतक-यांचा आवाज कधीच ऐकून घेत नाही. राज्यात भीषण दुष्काळ असताना राज्य सरकार केवळ घोषणाच करीत आहे. या सरकारला शेतक-यांची चिंता राहिलेली नाही. त्यामुळे शेतक-यांचा हा लढा शेतक-यांचा राहिला नाही तर संपूर्ण देशाचा लढा आहे. या लढ्यात कॉंग्रेस शेतक-यांसोबत आहे, असे महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद म्हणाले.

सरकारने केली
शेतक-यांची थट्टा
शेतकरी आस्मानी संकटाचा सामना करीत आहे. या वर्षी खरीप पूर्णत: वाया गेला. पेरलेले काहीच हाती लागले नाही. आता बघायचे कुणाकडे. मायबाप सरकार भरीव मदत करेल, ही अपेक्षा शेतकरी बाळगून आहे. मंत्रिमंडळ बैठकीत शेतक-यांना दिवाळीसाठी फक्त ५ हजार देण्याचा निर्णय झाला. हा निर्णय शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असून, दुष्काळात होरपळणा-या बळीराजाची ही थट्टा आहे, अशा शब्दांत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली.

काँग्रेसच्या प्रमुख मागण्या
संकटात सापडलेल्या शेतक-यांना मदत करण्याची ही वेळ आहे. राजकारण करण्याची नाही. शेतक-यांना सरसकट हेक्टरी १ लाख रुपये अनुदान द्या, कोणताही सर्व्हे, पंचनामा, अभ्यास न करता मदत करा. सरसकट कर्जमाफी करा, शेतमजुरांना सानुग्रह अनुदान द्या, मनरेगाची कामे सुरू करा, शेतकरयंच्या मुलांची सर्व शैक्षणिक फी माफ करा, एसटी पास मोफत द्या, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करा व सावकाराचा त्रास थांबवा, अशा मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43
Video thumbnail
Solapur Well Collapse: आंबे गावात विहीर खचली; चार जण मातीखाली अडकले, बचावकार्य सुरू
01:16
Video thumbnail
Latur Accident News: टाका पाटीजवळ भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
00:41
Video thumbnail
Latur Bank Election : लातूरचा मतदार सन्मान गहाण ठेवणारा नाही – आमदार अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य
05:40
Video thumbnail
Latur District Bank Election: योग्य उमेदवाराला मतदान करा – दिलीपराव देशमुखांचे आवाहन
01:10
Video thumbnail
Nanded News: आंतरपिकात गांजाची लागवड; 9 लाख 24 हजारांचा गांजा जप्त, किनवटमध्ये LCB ची कारवाई
00:43
Video thumbnail
Latur District Bank Election: धमक्या, द्वेषाशिवाय विरोधकांनी काही केलं नाही – धीरज देशमुखांचा प्रहार
04:38
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59

Latest news