कॉकरोच पार्टीचे दिल्लीत आंदोलन

तरुणाई जंतरमंतरवर, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
आंदोलक आक्रमक, सरकारला ५ दिवसांचा अल्टिमेटम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
विविध शैक्षणिक आणि भरती परीक्षांमधील गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या मुद्यावरून देशातील तरुण वर्ग आक्रमक झाला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आज सकाळी भारतात परतले असून, त्यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे या भव्य आंदोलनाचे नेतृत्व केले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करीत हजारो विद्यार्थी आणि तरुणांनी या आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनादरम्यान जंतर-मंतर परिसरात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती. दरम्यान, सायंकाळी ५ वाजेपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. परंतु सरकारने कुठलीही प्रतिक्रिया न दिल्याने आता ५ दिवसांची मुदत वाढविली. त्यानंतर देशभरात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

हे आंदोलन जनतेमधील तीव्र असंतोष आणि निराशेचा परिणाम आहे. कॉकरोच जनता पार्टीची मागणी आहे की, एक तर धर्मेंद्र प्रधान यांनी स्वत: राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. या आंदोलनात शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक आणि तरुण व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक आंदोलकांनी चेह-यावर कॉकरोचचे मास्क लावले होते आणि हातात फुले घेतली होती. आंदोलनस्थळी तरुणांनी धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. याच आंदोलनात जय भीमच्या घोषणाही देण्यात आल्या. सोशल मीडियावरून सुरू झालेली ही चळवळ आता थेट रस्त्यावर उतरल्याने केंद्र सरकारवरील दबाव वाढला आहे.

या आंदोलनादरम्यान बोलताना कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके म्हणाले की, आपला हा लढा मोठा आहे. आम्ही गेल्या एका महिन्यापासून सोशल मीडियावर शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहोत. मात्र, कारवाई करण्याऐवजी आमचे सोशल मीडिया अकाऊंटस् हॅक करणे, पोस्ट डिलिट करण्याचे काम केले जात आहे. तुम्ही आमच्या पोस्ट डिलीट करू शकता, पण आम्हाला इथून हटवू शकत नाही, या आंदोलनादरम्यान दिपके यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आत्मचरित्र पाहायला मिळाले. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनीही कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सहभाग नोंदवला आणि मार्गदर्शनही केले.

हे आंदोलन एक ट्रेलर
मी माझ्या आई-वडिलांना भेटायला घरी जात आहे. त्यांना भेटून आता एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. गेल्या १५ दिवसांपासून त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे आणि धमक्यांमुळे त्यांना घर सोडावे लागले आहे. मी त्यांना घरी परत घेऊन जाणार आहे. तुमच्या माहितीसाठी आजचे आंदोलन फक्त एक ट्रेलर होते. इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद, असे अभिजित दिपकेने म्हटले.

…तर देशव्यापी आंदोलन
कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सायंकाळी ५ पर्यंत राजीनामा दिला नाही तर देशभरात आंदोलन सुरू केले जाईल. आठवडाभर अनेक शहरांत आंदोलन केले जाईल आणि पुढील शनिवारी जंतरमंतरवर आणखी मोठ्या संख्येने निदर्शने केली जातील, असे म्हटले.

५ तास चालले आंदोलन
कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन ५ तास चालले.
कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे सकाळी १० वाजता आपल्या आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर दुपारी ३ वाजता अभिजित आणि सोनम वांगचुक तिथून रवाना झाले आणि त्यानंतर आंदोलनस्थळ हळूहळू रिकामे होऊ लागले. मात्र, पहिल्याच आंदोलनाला झालेली गर्दी पाहता याचे मोठे पडसाद देशात उमटण्याची शक्यता आहे.

आंदोलकांच्या ५ मागण्या
-केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा.
-योग्य प्रशिक्षणाशिवाय घाईघाईने डिजिटल शिक्षण नको
-शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी शिक्षकांना त्याचे योग्य प्रशिक्षण आणि मूल्यमापन दिले जावे.
-डिजिटल प्रणालीमुळे होणारे गैरप्रकार आधी रोखले जावेत.
-मणिपूरमधील शिक्षण व्यवस्था पूर्ववत करा.
-स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण करावी

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|MPSC ऑनलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार
00:30
Video thumbnail
Ramdas Athawale ON Sharad Pawar|शरद पवारांनी NDA मध्ये यावे, स्वागतच करू" – आठवले
11:50
Video thumbnail
Latur|द्रोणा डिफेन्स अकॅडमीविरोधात मनसेचे आंदोलन
03:19
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32
Video thumbnail
Nanded|महिलांची ताकद! वझरा गावात दारूबंदीचा ठराव मंजूर
00:25
Video thumbnail
Nanded|₹1.30 कोटींचा बंधारा... पण लाथ मारताच कोसळला?
02:50
Video thumbnail
Latur|सावकाराने जमीन हडपल्याचा आरोप; शेतकऱ्याचे आमरण उपोषण
04:42
Video thumbnail
Latur|गटप्रवर्तक महिलांचे आशाताई भिसे यांना साकडे
06:36
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16

Latest news