21.4 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeमुख्य बातम्याकोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

सिंधुदुर्ग : विशेष प्रतिनिधी
निवडणुकीत जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदार, एक माजी खासदार व एक माजी आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या तिन्ही मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्येच खरी लढत होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांना एकही जागा सुटलेली नाही. त्यामुळे त्यांचे उमेदवार आखाड्यात नाहीत.

कणकवली मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे नितेश राणे, महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेचे संदेश पारकर निवडणूक लढवित आहेत.

सावंतवाडीच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चा दावा असतानाही उद्धवसेनेने माजी आमदार राजन तेली यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) कडून तयारी करीत असलेल्या अर्चना घारे-परब या अपक्ष निवडणूक लढवत आहेत. तर भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब हेही निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीकडून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर पुन्हा निवडणूक लढवीत आहेत.

अपक्ष, बंडखोरांनी लावली ताकद
सावंतवाडी मतदारसंघांत बंडखोरी झाली त्यामुळे सुरुवातीला सरळ वाटणारी या मतदार संघातील निवडणूक चौरंगी होत आहे. महायुती आणि आघाडीसमोर बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. तिन्ही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची चुरस वाढली असून, त्यामुळे जिल्ह्यातील या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR