27.2 C
Latur
Friday, November 8, 2024
Homeलातूरकोळगावचे शेतकरी वडजकर 'रेशीमरत्न' पुरस्कार प्रदान

कोळगावचे शेतकरी वडजकर ‘रेशीमरत्न’ पुरस्कार प्रदान

रेणापूर :  प्रतिनिधी
तालुक्यातील कोळगाव येथील सुनिल वडजकर या रेशीम उत्पादक शेतक-यास महाराष्ट्र शासनाच्या रेशीमरत्न पुरस्काराने सोमवारी दि ७ रोजी अमरावती येथे सन्मानित करण्यात आले. या निवडीबद्दल या शेतक-याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.   रेणापूर तालुक्यातील कोळगाव येथील शेतकरी सुनिल वडजकर या शेतक-याने मागील काही वर्षांपासून रेशीम उत्पादनात भरीव कामगिरी केली. त्याचबरोबर त्यांनी तालुक्यातील व तालुक्याच्या बाहेरील अनेक शेतक-यांना रेशीम शेती करण्यासाठी नि:शुल्क माहिती देऊन रेशीम शेती करण्यासाठी प्रोत्साहित केले. यामुळे रेणापूर तालुक्यात व परिसरात रेशीम शेतीच्या माध्यमातून कोष उत्पादनात भरीव कामगिरी करून आर्थिक स्थैर्य प्राप्त केले. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सुनिल वडजकर  यांची २२-२३ च्या रेशीमरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
हा पुरस्कार अमरावती येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. अनिल बोंडे, नागपूर येथील रेशीम संचालनायाचे उपसंचालक डॉ. महंिद्र ढवळे आदी मान्यवरांच्या हस्ते सुनिल वडजकर पती पत्नीचा सत्कार करण्यात आला. या पुरस्काराबद्दल शेतकरी सुनिल वडजकर  यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR