क्लार्कपदाची टायपिंग चाचणीही रद्द

हायकोर्टाचा दणका, परीक्षांमधील गोंधळ संपेना
आता फेरपरीक्षा घ्यावी लागणार
मुंबई : प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाकडून १६ ऑगस्ट रोजी लिपिक पदासाठी टंकलेखन परीक्षा ऑनलाईन पद्धतीने राज्यभरात घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेमध्ये मोठा गोंधळ झाला. अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नव्हती. तांत्रिक अडचणीमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्यानंतर सीजेपीचे अभिजीत दीपके यांनी परीक्षा देणा-या उमेदवारांसोबत छत्रपती संभाजीनगरला ठिय्या आंदोलन केले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील पाठपुरावा केला होता.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने १६ ऑगस्टची ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेली क्लार्क टंकलेखन चाचणी रद्द केली. परीक्षेची नवी तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे कळविण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या क्लार्क म्हणजेच लेखनिक पदासाठी उमेदवारांना ऑनलाईन टंकलेखन चाचणी यशस्वी होणे आवश्यक होते. मात्र, परीक्षा केंद्रावरील विविध अडचणींमुळे आणि इतर अडचणींमुळे म्हणजेच सर्व्हर डाऊन होणे, कीबोर्ड व्यवस्थित न चालणे अशा समस्या विद्यार्थ्यांना आल्या होत्या. यानंतर विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर, कल्याण, वाशिम, हिंगोली यासह विविध ठिकाणी अडचणी आल्याचे सांगितले होते. अखेर मुंबई हायकोर्टाकडून १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाइन टायपिंग टेस्ट परीक्षेला रद्द करण्याचा निर्णय घेतला. या परीक्षेची तारीख लवकरच संकेतस्थळावर कळवली जाईल, असे सांगण्यात आले. १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेली न्यायालयीन क्लार्क पदाची टायपिंग टेस्ट रद्द करण्याचा निर्णय न्यायालय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले.

परीक्षेत मोठा गोंधळ
उच्च न्यायालयाच्या लिपिक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टायपिंगच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर उच्च न्यायालयाचे महानिबंधक मुनगंटे आणि महाधिवक्ता मिलिंद साठे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे संबंधित परीक्षेची टायपिंग टेस्ट रद्द करण्याची विनंती केली होती. त्यानुसार १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेली टायपिंग टेस्ट रद्द करण्यात आली. त्यामुळे मा. न्यायालयीन प्रशासनाचे आभार, असे रोहित पवार म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|पाऊस गायब, पिकं वाळली अन् बैलपोळाही फिका! लातूरच्या शेतकऱ्यांची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा
04:49
Video thumbnail
Nanded Accident|नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! 6 ठार, 8 गंभीर जखमी
00:46
Video thumbnail
Nanded|बैल पोळ्यातही मराठा आरक्षणाची धग! बैलांच्या पाठीवर लिहिले आरक्षणाचे नारे
00:43
Video thumbnail
Latur|स्कॉर्पियो पेटवली अन् आरोपी फरार! कव्हा नाका परिसरात खळबळ
00:42
Video thumbnail
Latur|मराठा आरक्षणासाठी मसलगा येथे मराठा समाजबांधव आक्रमक
01:31
Video thumbnail
Dharashiv|डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक; माडजमध्ये बैलपोळ्याचा उत्साह
01:06
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणासाठी टाकीवर आंदोलन; हदगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?
00:31
Video thumbnail
Nanded|मनोज जरांगे यांच्याबद्दल कॉमेंट करणाऱ्या नायब तहसीलदाराला कारणे दाखवा नोटीस
00:46
Video thumbnail
Latur Police|लातूरमध्ये हेल्मेट सक्तीचा धडाका! 7 दिवसांत तब्बल 5,799 केसेस
02:13
Video thumbnail
Latur|लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जिल्हाधिकाऱ्यांना साकडं
04:24
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27

Latest news