लातूर : प्रतिनिधी
ऑक्टोबर महिना संपत आला तरी अद्याप परतीच्या पावसाचा जोर दिसून आला नाही. यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीवर व उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. येत्या आठ दिवसात परतीचा पाऊस झाल्यास यावर्षी २ लाख ७२ हजार २२५ हेक्टवर पेरणी होण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस न पडल्यास केवळ चा-यांच्या पिकांची ५ ते १० टक्के पेरणी होऊ शकेल असा अंदाज कृषि विभागाकडून वर्तवला जात आहे.
लातूर जिल्हयात सरासरी ७०६ मिमी पाऊस पडतो. तो यावर्षी ३६३ मिमी म्हणजे एकूण सरासरीच्या ५१ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हयाच्या भूजल पातळीतही म्हणावी तशी वाढ झाली नाही. त्यामुळे जिल्हयातील नागरीकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी जिल्हयात अतिवृष्टी होऊन सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतक-यांच्या डोळया देखत सोयाबीनच्या गंजी पाण्यात वाहून गेल्या. तर यावर्षी एल निनोमुळे जून पासून पाऊस विषम स्वरूपातच पडला. त्यामुळे कांही शेतक-यांना दुपार पेरण्या कराव्या लागल्या, तसेच पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर मोठा परीणाम झाला आहे.
जिल्हयात सध्या सोयाबीन पिकांची काढणी जवळपास संपत आली आहे. जर येत्या आठ दिवसात परतीचा पाऊस पडला तर या आशेवर शेतकरी रब्बीच्या पेरण्यासाठी शेतीची मशागत करत आहेत. तसेच कृषि विभागानेही पाऊस पडल्यास जिल्हयात २ लाख ७२ हजार २२५ हेक्टर क्षेत्रावर रब्बीचा पेरा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यात ज्वारीचा २६ हजार १६३ हेक्टरवर, मका ७२६ हेक्टर, गहू १० हजार २९२ हेक्टर, हरभरा २ लाख २६ हजार ४९३ हेक्टर, करडई ८ हजार ४२७ हेक्टर, सुर्यफूल ३३ हेक्टर, जवस ८२ हेक्टर, भुईमूग, लहान कारळे आदी पिकांचा पेरा होण्याची शक्यता आहे.
बी-बियाणे, खताला मागणीच नाही
लातूर जिल्हयात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप हंगाम धोक्यात आलेला असून रब्बी हंगामावर देखील याचा परिणाम दिसून येत आहे. रब्बीचा हंगाम १ ऑक्टोबर ३१ मार्च असा असतो. बाजार पेठेत हरभ-याचे १२ हजार ५१५ क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच ज्वारी २७० क्विंटल, गजू ९० क्विंटल, करडी २४० क्विंटल, करडी २४० क्विंटल बियाणे बाजार विक्रीसाठी आले आहे. तसेच डीएपी ३ हजार ७२५ मे.टन, एमओपी ६७० मे.टन, एनपीके १८ हजार ५८५ मे.टन, एसएसपी ९ हजार ३०२ मे.टन, तर युरीया १२ हजार ६७७ मे.टन असा ४४ हजार ९५९ मे.टन खत दुकानात विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच पुणे आयुक्त कार्यालयाकडून ७० हजार ७०० मे.टन खत मंजूर असून तो टप्या-टप्याने या हंगामात येणार आहे. पाऊस नसल्याने बि-बियाणे व खतांना शेतक-यांकडून उठाव नाही. एक ते दोन पाण्यावर येणा-या चारा पिकांवर शेतक-यांचा भर राहिल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाचे मोहिम अधिकारी मिलींद बिडबाग यांनी सांगीतले.