खासदार फोडण्यात सचिन अहिर यांची मोठी कामगिरी

मुंबई : प्रतिनिधी
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (२ जुलै) माध्यमांशी बोलताना पुन्हा भारतीय जनता पक्षावर खरमरीत टीका केली. त्याचवेळी राज्यातील राजकारणाचा गोलपिठा कुणी केला, असा सवालही केला. यावेळी संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे असूनही शिवसेनेतून उपसभापती झालेल्या सचिन अहिर यांच्यावर सडकून टीका केली. कोणत्याही खासदाराचे नाव न घेता इकडचे जे खासदार फुटले, त्याचे बक्षीस म्हणून सचिन अहिर यांना उपसभापतिपद दिल्याचा मोठा दावा राऊत यांनी केला. खासदार संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे सत्ताधा-यांवर कठोर टीका करताना भाजपचे राजकारण आणि सचिन अहिर यांना लक्ष्य केले. काल (१ जुलै) तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला.

प. बंगालमध्ये तृणमूलच्या आमदार, खासदारांवर हल्ले सुरू आहेत. या देशाचे राजकारण भाजपने इतक्या खालच्या पातळीवर नेले आहे की, भविष्यामध्ये सांगावे लागेल या देशात केव्हातरी लोकशाही होती, या शब्दांत संजय राऊत यांनी भाजपला बोचकारले. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाला एक प्रतिष्ठा होती. त्या राजकारणाचा गोलपिठा कुणी केला? या सर्वांचा डीएनए तपासावा लागेल, असा भाजपचे नाव न घेता राऊतांनी हल्लाबोल केला. त्याचवेळी ‘ऑपरेशन टायगर’, ‘ऑपरेशन तुतारी’ वगैरे बोलले जाते. एक दिवस ‘ऑपरेशन कमळ’देखील होईल, असे भाकित त्यांनी केले.

यावेळी खासदार संजय राऊत यांनी विधान परिषदेचे नवे उपसभापती सचिन अहिर यांच्यावर कडवट टीका केली. सचिन अहिर यांचे काय झाले? इकडचे खासदार फोडल्याचे बक्षीस म्हणून सचिन अहिर यांना उपसभापतिपद देण्यात आले, असा आरोप राऊत यांनी केला. एवढेच नाही तर आमच्या पक्षात राहून सचिन अहिर शिंदे गटाचे, भाजपचे आणि फडणवीसांचे काम करत होते.

इकडचे खासदार फोडण्यात सचिन अहिर यांनी फार मोठी कामगिरी बजावली आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी अहिर यांचा समाचार घेतला. सचिन अहिर ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. उपसभापतिपदासाठी त्यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिल्याचे समोर आले. हा सर्वांसाठी ख-या अर्थाने धक्का होता. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना विजयी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे त्यांना विधान परिषदेत पाठवण्यात आले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड पूल कोसळल्याप्रकरणी केंद्रीय पथकाची तपासणी; तांत्रिक त्रुटींचे प्राथमिक संकेत
01:33
Video thumbnail
परभणीत महिला बचत गटांचे आमरण उपोषण; २ महिलांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
01:50
Video thumbnail
Latur|पाऊसानंतर आता गोगलगायींचा कहर; शेतकरी संकटात!
06:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सर्व इमारतींचे तात्काळ फायर ऑडिट; मनपा ॲक्शन मोडवर
02:28
Video thumbnail
Kishor Jadhav Shivnikar Maharaj|पिस्तुल्या शिवणीकर महाराजाला ४ दिवसांची पोलीस कोठडी
02:56
Video thumbnail
Solapur|सांगोल्यात १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त; ३७ हजार लिटर दूध जागेवरच नष्ट
01:42
Video thumbnail
Latur|नागलगाव परिसरातील पाझर तलाव कोरडे, जनावरांवर पाणीटंचाईचे संकट
01:15
Video thumbnail
हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माऊलींच्या पालखीचा दिवे घाटातील विहंगम सोहळा, डोळे दिपवून टाकणारा व्हिडिओ
00:40
Video thumbnail
Parbhani|महेश बिडगर मारहाण प्रकरण; न्यायाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा गंगाखेड बंद, ठिय्या आंदोलन
01:37
Video thumbnail
Latur|११ कार्यालये एकाच छताखाली; लातूरला मिळणार आधुनिक सहकार भवन
08:16
Video thumbnail
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट पलटली, १५ जणांचा मृत्यू
00:39
Video thumbnail
NANDED|नांदेड अतिक्रमण कारवाईत गोंधळ; जेसीबीच्या धडकेत व्यक्ती जखमी, पोलिसांचा बळाचा वापर
02:10
Video thumbnail
Nanded|कोसळलेल्या पुलाची आमदार आनंद बोंढारकरांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना खडे बोल
02:06
Video thumbnail
Latur|खंडापूर देणगी अपहार प्रकरणात किशोर शिवणीकर अटकेत; दीड कोटींच्या बंगल्यातून एलसीबीची कारवा
05:16
Video thumbnail
Latur|आरक्षणावर नवा फॉर्म्युला! 'अ, ब, क, ड' ऐवजी दोनच गटांची मागणी
03:06

Latest news