नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे दिल्लीतील घडामोडींनंतर शुक्रवारी (दि.१९) नाशिकमध्ये दाखल झाले. शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६ खासदारांनी बंड पुकारलं असताना कथितरीत्या कोट्यवधी रुपयांची ऑफर्स धुडकावून खासदार राजाभाऊ वाजे उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले.
यामुळे त्यांचे नाशिकमध्ये सर्वत्र कौतुक होत असून शिवसेना (उबाठा) पक्षाकडून ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांचं प्रेम बघून खासदार राजाभाऊ वाजे भावुक झाले होते.
दिल्लीत ‘ऑपरेशन टायगर’ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नऊपैकी सहा खासदारांनी बंड केलं. या घडामोडीत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले आहेत. त्यामुळं खासदार वाजेंची पक्षावरील एकनिष्ठता बघून कार्यकर्त्यांनी राजाभाऊ वाजे दिल्लीवरून रेल्वेनं नाशिकमध्ये परतल्यावर त्यांचं ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत भव्य स्वागत केलं. कार्यकर्त्यांचा हा उत्साह बघून खासदार राजाभाऊ वाजे भावुक झाल्याचं बघायला मिळालं.
















