23.5 C
Latur
Thursday, January 15, 2026
Homeपरभणीगंगाखेड तालुक्यात दोन गटांत तुंबळ हाणामारी

गंगाखेड तालुक्यात दोन गटांत तुंबळ हाणामारी

पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर; ३३ जणांवर गुन्हे दाखल

गंगाखेड : तालुक्यातील इरळद येथील देवईमाय मठ येथे बुधवारी जत्रा होती. सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास दोन लहान मुलाच्या भांडणाचा वाद विकोपाला गेला. त्यानंतर दोन्ही गटातील माणसांनी लाठ्या, काठ्या, दगडानी एकमेकास तुंबळ हाणामारीस सुरुवात केली. या मारहाणीत दोघेजण गंभीर जखमी झाले. सदरील भांडण पेटण्याच्या मार्गावर असताना पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. त्यानंतर दोन्ही गटातील एकुण ३३ जणांवर पोलिसांनी गुरुवारी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे.

सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी इरळद येथे दोन गटांत तुंबळ मारामारीची घटना घडल्याने परीसरात भितीचे वातावरण पसरले होते. देवईमाय मठ इरळद येथे जत्रा होती. या जत्रेत दोन लहान मुलांच्या किरकोळ भांडणाचे रूपांतर मोठ्या माणसात तुंबळ हाणामारीत झाले. मंदिराच्या पाण्याच्या टाकीजवळ ३३ जणानी हातात काठ्या, दगड घेत एकमेकांना बेदम मारहाण सुरू केली. हे भांडण अधिक आक्रमक होत असल्याचे लक्षात येताच पोलीसानी सौम्य बळाचा वापर करून जमावाला पांगवले. या घटनेत दोन गंभीर जखमी झाले असून त्यांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. यावेळी रूग्णालयात नागरीकांचा मोठा जमाव जमला होता.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यांनी फिर्याद दिली असून दोन्ही गटातील एकुण ३३ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यात काशिनाथ मुलगीर, देवराव मुलगीर, चंद्रकांत ढेरे, बाबलु ढेरे, भैया ढेरे, भागवत गाडवे, संदिप तुरनर,अजय राऊत, डिंगाबर गाडवे, मुजा कुबने, राघोजी खजे, भानुदास जाधव, देविदास मुलगीर, निवृत्ती निळे, हनुमंत वाटोळे, रखमाजी सदगे,अरविंद मुलगीर,ज्ञानोबा मुलगीर,गोविद मुलगीर, गोटू वाघमारे, आदीत्य मुलगीर, हनुमान वाटोळे, विजय काळे, योगेश काळे, आदित्य काळे, अरूण पवार, बळी काळे,कोब्राजी पवार, विशाल काळे, गणेश काळे, नितीन काळे, ढोल्या पवार, आकश पवार सर्व राहणार इरळद, नरदळद यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR