गंगाखेड -नगरपरिषद निवडणूकीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सौ.उर्मीलाताई मधुसूदन केंद्रे याचा ६७८ मतानी विजय झाला. गंगाखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नगराध्यक्ष म्हणून विजयी झाला, मात्र अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ ७ उमेदवार नगरसेवक म्हणून विजयी झाले.
यापक्षासोबत उध्दव ठाकरे शिवसेनेची युती होती.उध्दव ठाकरे शिवसेने ३ नगरसेवक निवडून आले. तर यंशवत सेना व गंगाखेड नगर विकास आघाडच्या उमेदवारानी आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे याच्या नेतृत्वात निवडणूक लढवली होती.या यशवंत सेना पक्षाचे १५ नगरसेवक निवडून आले. भाजपाचा १ नगरसेवक निवडून आला.असे एकुण २६ नगरसेवक विजयी झाले. नगराध्यक्ष पदाला नगरसेवकाचे बहुमत नाही.

