23.4 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeलातूरगणपती बाप्पा मोरया; पुढच्या वर्षी लवकर या...!

गणपती बाप्पा मोरया; पुढच्या वर्षी लवकर या…!

लातूर : प्रतिनिधी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वषी लवकर या…!, असा प्रेमाचा आग्रहक करीत दि. १७ सप्टेंबर रोजी लातूर शहरात गणेश विसर्जन शांततेत पार पडले. उत्साह प्रचंड असला तरी एकही अनुचित प्रकार न घडता ‘श्री’ विसर्जन झाले. विसर्जनाचा पहिला मान असलेला भारतरत्नदीप आझाद मंडळाच्या (आजोबा गणपती) ‘श्री’ची विसर्जन मिरवणुक दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास निघाली. त्यानंतर शहरातील सर्वच मंडळाच्या ‘श्री’ विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. सुमारे १५ तास विसर्जन मिरवणुका चाललल्या.
सुभाष चौकात सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास आजोबा गणपतीची आरती झाली. विसर्जनाचा शेवटचा मान असलेले औसा हनुमान गणेश सांस्कृतिक मंडळची विसर्जन मिरवणुक रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास निघाली. विसर्जन मिरवणुका तब्बल १५ तासांपेक्षाही अधिक काळ चालल्या. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास औसा हनुमान गणेश सांस्कृतिक मंडळाच्या ‘श्री’ची आरती झाली. बाप्पा सार्वजनिक गणेशोत्सव, अमर गणेश मंडळ, आप्पा गणेश मंडळ, ओंकार गणेश मंडळ, महालक्ष्मी गणेश मंडळ, गवळीराजा गणेश मंडळ, इच्छापुवर्ती गणेश्.ा मंडळ, दशभुजा गणेश मंडळ, विश्वभारती गणेश मंडळ आदी गणेश मंडळांच्या भव्य-दिव्य मिरवणुका होत्या.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक, दयानंद गेट व विविध ठिकाणी विसर्जन मिरवणुकांचा जल्लोष होता. लातूरचा राजा, लातूरचा महाराजा, खाडगाव रोडचा श्रीमंत, लातूरचा जहागीरदार, विश्वाचा राजा, दयानंद गेटचा महागणपती, बाप्पा गणेश मंडळ, श्रीमंत प्रभाग गणेश मंडळ, एकता गणेश मंडळ, त्रिमुर्ती त्रिआनंद गणेश मंडळ, वीर हनुमान गणेश मंडळ, मातोश्री गणेश मंडळ, सेंट्रल हनुमान गणेश मंडळ, शिवतरुण गणेश मंडळ, रणवाद्य परिवार गणेश मंडळ, श्री अष्टविनायक गणेश मंडळ, श्री गजराज गणेश मंडळ, त्रिमुर्ती त्रिआनंद गणेश मंडळ, श्रीकृष्ण सांस्कृतिक गणेश मंडळ यांच्यासह विविध गणेश मंडळांच्या ‘श्री’ विसर्जन मिरवणुकांनी लक्षवेधून घेतले.
 पारंपारीक ढोल-ताशा पथकांचा आवाज घुमला. युवक, युवती, महिला व लहान मुलांचा सहभाग असलेल्या ढोल-ताशा पथकांनी आपली कला सादर करुन टाळ्या मिळवल्या. आजोगा गणपतीच्या ‘श्री’ विसर्जन मिरवणुक निघाली. यंदाही बाल वारकरी पथकाने लक्षवेधले. औसा हनुमान गणेश सांस्कृतिक मंडळाने  डाल्बी टाळून पारंपारी वाद्यांसह मिरवणुक काढली. बाप्पा गणेश मंडळाने यंदाही सजीव देखावा सादर केला. १९१ सदस्यांच्या ढोल-ताशा पथकासह साडेतीन शक्तीपीठाचा जागर केला. ‘श्री’ विसर्जन मिरवणुक मार्गावर गंजगोलाई विलासराव देशमुख युवा मंच, सुभाष चौकात सुभाष चौक मित्र मंडळ, लातूर मध्यवर्ती गणेशोत्सव यांनी मंच उभारुन ‘श्री’ विसर्जन मिरवणुकांचे स्वागत केले.

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिल्या श्री विसर्जन मिरवणूक स्वागत मंचांना भेटी

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी लातूर शहरातील गंजगोलाई या ठिकाणी विलासराव देशमुख युवा मंचकडून उभारण्यात आलेल्या श्री विसर्जन मिरवणूक स्वागत मंचास भेट दिली. यावेळी शहरातील विविध भागातून विसर्जनास जाणा-या गणेश मंडळाच्या मिरवणुकांचे स्वागत केले. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून विश्व भारती गणेश मंडळ अध्यक्ष सुरज राजे यांच्यासह संजय काथवटे अन्य मंडळ पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच गणेश मंडळाकडून साकारण्यात आलेले देखावे,नृत्य सादरीकरनाचा आनंद घेतला.

दरम्यान शहरातील सुभाष चौक भागातील सार्वजनिक उत्सव समिती स्वागत मंडप व सुभाषचंद्र बोस मित्र मंडळ स्वागत मंडपास भेट देऊन गणेश मंडळाचे स्वागत केले,मंडळ पदाधिकारी,सदस्यांचा उत्साह वाढविला व सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, रवींद्र काळे, अ‍ॅड. दीपक सूळ, अ‍ॅड. फारुक शेख, प्रा. प्रवीण कांबळे, सुपर्ण जगताप, व्यंकटेश पुरी, नागसेन कामेगावकर, संतोष देशमुख, सचिन बंडापल्ले, विजयकुमार साबदे, महेश काळे, राजकुमार माने, कैलास कांबळे, यशपाल कांबळे, मोहन सुरवसे, तबरेज तांबोळी, प्रवीण सूर्यवंशी, पंडित कावळे, इम्रान सय्यद, विकास कांबळे, रईस टाके, विजय टाकेकर, करीम तांबोळी, सुलेखा कारेपूरकर,अभिजित इगे,पिराजी साठे, युसुफ बाटलीवाले यांच्यासह पदाधिकारी, सदस्य, गणेशभक्त, नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR