गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

मुंबई : प्रतिनिधी
गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य करण्यात येणार असल्याचे, तसेच गणेशमूर्तीच्या जडणघडणीपासून ते मूर्तीची मंडळाला डिलिव्हरी होईपर्यंतची संपूर्ण माहिती ठेवणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे वृत्त विविध समाजमाध्यमांवर तसेच काही ठिकाणी प्रसारित झाले होते.

एक टनापेक्षा अधिक वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य करण्याबाबत अथवा मूर्तीच्या जडणघडणीपासून ते तिच्या वितरणापर्यंतची संपूर्ण माहिती नोंदविणे बंधनकारक करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नाही किंवा अशा स्वरूपाचे कोणतेही निर्देश जारी केलेले नाहीत. त्यामुळे या संदर्भात समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या संदेशांवर अथवा वृत्तांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.

सुरक्षित गणेशोत्सवासाठी बीएमसी सज्ज

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींच्या आगमनादरम्यान सुरक्षिततेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गणेश मंडळांनी गणेशमूर्तींच्या आगमन सोहळ्याचे नियोजन करताना पोलिस विभाग, वाहतूक विभाग तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याशी समन्वय साधावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. गणेशोत्सव उत्साहात, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही महानगरपालिकेने नमूद केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26
Video thumbnail
Latur|हातातोंडाशी आलेला घास गेला! लातूरमध्ये पाण्याअभावी उभी पिकं करपली
03:42
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
07:57
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
10:46
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:02
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
16:29

Latest news