22.6 C
Latur
Sunday, December 14, 2025
Homeमहाराष्ट्रगद्दारांचा बुडबुडा फुटला : उद्धव ठाकरे

गद्दारांचा बुडबुडा फुटला : उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी
नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीच्­या रणधुमाळीत महायुतीच्या नेत्यांवर त्यांच्याच लोकांनी धाडी टाकल्या. हेलिकॉप्टरमधून पैशांच्या बॅगा कशा नेत होते, हे संपूर्ण राज्­याने पाहिले आहे. आता या ‘गद्दारांचा बुडबुडा फुटला असून, त्यांच्यातच बाचाबाची सुरू झाली आहे,’ अशा शब्दांत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर थेट निशाणा साधला.
शिवसेनेचा अस्सल भगवा झेंडा आपल्याला दिसायला हवा. भगव्यावर आता कोणतेही चिन्ह नको. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवाच आता दिसायला हवा, असे आवाहनही त्यांनी आज (दि. ३ डिसेंबर) माध्यमांशी बोलताना केले. मागील दोन-चार वर्षांत आपण ज्या पेगासस स्पायवेअरबद्दल ऐकत होतो, त्याचे नाव बदलून आता संचार साथी ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारने आपल्याच लोकांवर अविश्वास दाखवायला सुरुवात केली आहे. दहशतवाद्यांवर लक्ष ठेवण्याऐवजी ते सामान्य जनतेवर पाळत ठेवत आहेत, असा आरोपही त्­यांनी केला.

सत्ताधा-यांचा घोटाळा चव्हाट्यावर
एकीकडे हे सुरू असताना, दुसरीकडे निवडणूक सुरू असताना सत्ताधारी पक्षाचेच लोक त्यांच्यावर धाडी टाकत आहेत. हेलिकॉप्टरमधून पैशांच्या बॅगा कशा नेत होते, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. या सर्व घोटाळ्यांमुळे आता सगळेजण जागे होत आहेत.

शिवसेनेचा अस्सल भगवा झेंडा आता दिसायला हवा
पुढील महिन्­यात महानगरपालिका निवडणूक जाहीर होईल. शिवसेनेचा अस्सल भगवा झेंडा आपल्याला दिसायला हवा. भगव्यावर आता कोणतेही चिन्ह नको आहे. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवाच आता दिसला पाहिजे, असे आवाहनही त्­यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR