अहमदपूर: रविकांत क्षेत्रपाळे
राज्यात सर्वत्र दुष्काळाचे अतीशय भीषण संकट ओढवलेले आहे. दुष्काळा-मुळे शहरी भागांतील अनेक कामे रखडणार आहेत. त्यामुळे शहरी भागांतील मजुरांचीही चिंता वाढली असल्यामुळे त्यांना झोप येत नाही. अशावेळी गरीब, मजुर कामगार यांना शिवभोजन थाळीचा फार मोठा आधार आहे. मात्र सरकारच्या कठोर निर्णयामुळे हा आधार अडचणीत आला आहे.
शहरात काही मजूर, कामगार एकत्र काम करीत असतात आणि अशावेळी काम सुरू ठेऊन त्यातील एखादा मजूर भोजन केंद्रात जाऊन सर्वांच्या जेवनाचे पार्सल घेऊन जात असतो पण शासनाने पार्सल योजना बंद करून अनेक कामगार, कष्टकरी, शेतकरी यांच्यावर या नियमामुळे अन्याय केला आहे. काही कामगार कामासाठी बाहेर पडतात. अशा गरीबांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. सरकार शिवभोजन केंद्रातील एका थाळीला ६० रुपये देत असल्याचे सांगितले. कामगार, कष्टकरी, महीलांना हे जेवण चांगले, रुचकर,सकस मिळणे आवश्यक आहे. पण केंद्र अधीक चांगले चालावेत यासाठी सरकारनेही अधिक सुधारणा करणे अत्यंत गरजेचे मानले जाते.
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सर्व जुने शासन निर्णय एकत्रित करुन नवी नियमावली जारी केली आहे. या शिव भोजन केंद्र चालकाने ही गहू, तांदूळ,दाळ ब-यापैकी वापरुन कामगारांना किमान खाण्यासाठी जेवण बरे करावे.आणि सरकारनेही कष्टकरी यांना सकस आहार मिळावा म्हणून एका थाळीला ६० रूपये ऐवजी किमान ८० रुपये करावे अशी अनेकांची मागणी आहे.शिवभोजन केंद्र चालकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास रोज ५ हजारांचा दंड लावला जाणार आहे.
















