Homeमहाराष्ट्रगरोदर महिलांवरही खरातचा लैंगिक अत्याचार

गरोदर महिलांवरही खरातचा लैंगिक अत्याचार

नाशिक : प्रतिनिधी
भोंदू अशोक खरात प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून एका पाठोपाठ खळबळजनक माहिती समोर येत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिसांकडून खरातची कसून चौकशी सुरू आहे. शेकडो महिलांचे शोषण करणा-या खरातला आज गुरुवारी सुनावणीसाठी कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी तपास अधिका-यांनी कोर्टात कागदपत्रे आणि लॅपटॉप देखील आणला. भोंदू खरात हा लॅपटॉप समोर ठेवून महिलांवर लैंगिक अत्याचार करायचा, असा संशय व्यक्त केला जात आहे. भोंदू खरातने ७ महिन्यांच्या गरोदर महिलेला देखील सोडले नसल्याची धक्कादायक माहिती अधिका-यांनी कोर्टात सांगितली.

भोंदू खरातला आज गुरुवारी कोर्टात हजर केले. त्याला तिस-या गुन्ह्यात ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी कोर्टात सरकारी वकील, तपास अधिकारी, आरोपीचे वकील होते. न्यायमूर्ती बी. एन. इचपुराणिक यांच्यासमोर सुनावणी झाली. तपास अधिका-यांनी कागदपत्रे आणि सोबत लॅपटॉप आणला होता. यावेळी तपास अधिका-यांनी महत्त्वाचे पुरावे सादर केले.

तपास अधिका-यांनी कोर्टाकडे अशोक खरातची ७ दिवसांची कोठडी मागितली. परंतु कोर्टाने खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी दिली. खरातने ७ महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. त्याने सातव्या महिन्यात नजर लागते म्हणून विशिष्ट विधी करावा लागतो असे सांगितले. त्याने महिलेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला. तसेच बाजारातील चिंचोके पॉलिश करून लाखो रुपयांना विकले. विधी करत असताना नकली साप, वाघाचे कातडे दाखवण्यात आले.

नकली साप, वाघाचे कातडे हे कुठून आणले, याचा तपास हा अधिका-यांना करायचा आहे. त्याचबरोबर नकली खडे त्याने कोणाकडून घेतले, याचा तपास देखील करायचा आहे. लैंगिक अत्याचार करताना त्याने लॅपटॉप समोर ठेवून व्हीडीओ केल्याचा संशय आहे. खरातच्या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. आरोपी हुशार आणि चाणाक्ष आहे. आरोपी खरात तपासात सहकार्य करत नाही, असेही अधिका-यांनी कोर्टात सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR