नांदेड : प्रतिनिधी
सार्वजनिक ठिकाणासह आठवडी बाजारातून मिसींग झालेले ३२ लाख ८९ हजार रूपयांचे २०५ मोबाईल हस्तगत करण्यात आले. सदर कारवाई सायबर शाखेने केली असून पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते काही जणांना सदर मोबाईल परत देण्यात आले. उर्वरीत मोबाईलची ईएमआय कं्रमांकाची माहिती पोलिस दलाच्या फेसबुक व व्टीटरवर टाकण्यात आली आहे. नागरिकांनी मोबाईलचा क्रमांक ओळखून सायबर सेलशी संर्पक करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड शहरासह जिल्हयात सार्वजनिक ठिकाण आणि आठवडी बाजारातून मिसींग झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सायबर सेलचे पोनि धिरज चव्हाण यांना दिले होते. यानूसार जिल्ह्यातील पोलिस ठाणे अंर्तगत पथकाव्दारे मोहिम राबविण्यात आली. पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने जिल्ह्यात वेगवेगळया ठिकाणी मिसींग मोबाईलचा शोध घेत ३२ लाख ८९ हजार रूपयांचे २०५ मोबाईल हस्तगत करण्यात आले. रविवारी पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते मुळ मालकांना काही मोबाईल परत देण्यात आले. उर्वरित मोबाईलचे आयएमईआय कं्रमांकाची माहिती पोलिस दलाच्या फेसबुक व व्टीटरवर टाकण्यात आली आहे. नागरिकांनी मोबाईलचा क्रमांक ओळखून सायबर सेलशी संर्पक करावा असे आवाहन करण्यात आले आहे.