लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील सिकंदरपूर येथे ग्राम विकासाला चालना देण्यासाठी तथा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची गाव पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री शिवाली परब आले होते. सिकंदरपूर गावचे कौतुक करताना सिने अभिनेते पृथ्वी प्रतीक यांनी गावचा चौफेर विकास पाहून सिकंदरपूर गाव हेच सेलिब्रेटी झालं पाहिजे व सिकंदरपूर गाव पहायला राज्यातील लोक नक्कीच येतील असा विश्वास व्यक्त केला.
सिकंदरपूर येथे महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री शिवाली परब यांची रथा मधून वाजत गाजत लेझीम पथक भजनी मंडळ यांच्या टाळ, मृदंग निनादात मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढली. तज्ञनंतर गणेश पाटील यांच्या दोन वर्षीय देवणी कालवाडीचे पूजन करून पशुधन आरोग्यचा शुभारंभ करण्यात आला. आय.एस.ओ. ग्रामसंसद भवन सिकंदरपूर येथे या कलाकार व मान्यवरांचे औक्षण करून ग्रँड वेलकम करण्यात आले. तसेच १७ सप्टेंबर पासून आज पर्यंत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत राबवण्यात आलेल्या नवीन्यपूर्ण प्रकल्प व योजणांची प्रोजक्ट वरून माहिती देण्यात आली. तज्ञनंतर आय. एस. अंगणवाडीची पहाणी करून छोटया बालकांसोबत संवाद साधला व प्रतिनिधिक स्वरूपात बेबी किटचे वाटप केले. त्यानंतर मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन करून गावातील महिलांनी लावलेल्या बचत गटाच्या स्टॉलला भेट देऊन बचत गटातील महिलांचे कौतुक केले. त्या नंतर सेलिब्रेटीच्या हस्ते गावातील माजी सैनिक जयदीप चव्हाण व सुग्रीव गंभीरे यांचा प्रशतीपत्र शाल फेटा व वृक्ष देऊन करण्यात आला. निवृत्ती गरगट्टे, इस्माईल शेख, सचिन पवार या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मोदी आवास योजना, प्रधान मंत्री आवास योजना मधील घरकुलाचे कामं परिपूर्ण झाल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आदर्श सरपंच प्रा. रेशमा माधवराव गंभीरे यांनी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हे केवळ स्पर्धेपूरते मर्यादित न ठेवता ते आमच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनवून आमच्या गावचा शास्वत विकास साधणार आहोत अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक संघांचे जिल्हा सरचिटणीस केशव गंभीरे यांनी तर आभार यशदा प्रवीण प्रशिक्षक माधव गंभीरे यांनी मानले अध्यक्षीय समारोपात लातूर पंचायत समितीचे नूतन सभापती श्रीकांत बैले यांनी ‘ज्यो जिता वही सिकंदरपूर’ असे ब्रिद वाक्य राहणार असून सिकंदरपूर हे गावच राज्याचा ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज’ अभियानाच्या बक्षिसास पात्र राहील अशा शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास अभियानाचे राज्य समन्वयक बिभीषण पाटील, लातूर पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभाती महेश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य महादेव मस्के, पंचायत समिती सदस्या प्रिया नामदेव उपाडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, लातूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शाम गोडभरले, बालाजी पोतदार, पंचायत समिती येथील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, विस्तार अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

