27 C
Latur
Friday, March 6, 2026
Homeमहाराष्ट्रगिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय

गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय

मुंबई : प्रतिनिधी
पुण्यातील खराडी भागातील एका गेस्ट हाऊसमध्ये पोलिसांनी धाड टाकून रेव्ह पार्टी उधळली. यात पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये विधान परिषदेचे आमदार आणि शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अशात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.

दोन दिवसांपासून एकनाथ खडसे सरकारविरोधात, गिरीश महाजन यांच्याविरोधात महिलेसंदर्भात, हनी ट्रॅप प्रकरणात ठामपणे, पुराव्यांसह बोलत आहेत. त्यानंतर ताबडतोब २४ तासांत ही रेव्ह पार्टीची कारवाई झाली आहे. एकनाथ खडसे यांनी महाजनांवर जे आरोप केले त्याची चौकशी होत नाही, पण जो आरोप करतो आहे त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात. अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव्ह पार्टी आहे. खोटे गुन्हे दाखल केले जातात.

नाशिकमध्ये शिवसेनेच्या दोन लोकांना महाजन प्रवेश देत आहेत, त्यांच्यावर आधी गुन्हे दाखल केले, त्यांच्यावर भाजप पक्षात येण्यासाठी दबाव आणला आणि ते भाजपमध्ये जाण्याआधी त्यांच्यावरचे गुन्हे काढून टाकले. हे एक नवीन तंत्र आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या कुटुंबावर कारवाई झाली असेल, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. यापुढे फडणवीसांच्या राज्यात अशा प्रकारच्या कारवायांना सामोरे जावे लागेल, अशी टीका राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर केली आहे.

गिरीश महाजनांवर राऊतांची टीका
गिरीश महाजन नावाचा सांड हा मोकाट सुटला आहे. याला आवरले नाही, तर हा देवेंद्र फडणवीस यांनाही गाडल्याशिवाय राहणार नाही, यंत्रणांचा खोटा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करणा-या प्रवृत्ती आहेत, ईडी, सीबीआयविरोधात आम्ही लढतो आहोत, पण ते तुम्हाला महाग पडेल, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी गिरीश महाजनांवर केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR