नवी दिल्ली : आयपीएलच्या १९ व्या हंगामातील १४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने आले होते. या अटीतटीच्या सामन्यात गुजरात टायटन्सने थरारक विजय मिळविला.
दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २१० धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने चांगली सुरुवात केली. परंतु नंतर नितीश राणा, समीर रिझवी, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स चांगली कामगिरी करू शकले नाहीत. केएल राहुलने ९२ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी अखेरच्या दोन ओव्हरमध्ये ३६ धावांची गरज होती. सिराजच्या १९ व्या ओव्हरमध्ये दिल्लीने २३ धावा काढल्या. अखेरच्या षटकात १३ धावा करायच्या होत्या. पण दिल्लीला ११ धावा करता आल्या. अखेरच्या २ बॉलमध्ये दिल्लीला २ धावा हव्या होत्या. मात्र पाचव्या बॉलवर डेव्हिड मिलरने रन घेतली नाही. यामुळे दिल्लीला विजयासाठी १ बॉल आणि २ धावा हव्या करायच्या होत्या. अखेरच्या बॉलवर मिलरला फटका मारता आला नाही. त्यातच कुलदीप यादव धावबाद झाला आणि गुजरातने विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने २० ओव्हरमध्ये २०९ धावा केल्या.

