गुन्हेगारी थांबवता येईना, धंदे बंद करताय

पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी/प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहानंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणा-या छोट्या व्यावसायिकांना रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या २४ तास काम करणारे शहर झाले आहे. या शहरात हातावर पोट असणा-या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन पोलिस प्रशासन नेमकं काय सिद्ध करू पाहतंय? असा सवाल त्यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शहरातील महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून कोयता गँगचा धुमाकूळ, गोळीबार आणि लूटमारीच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. मूळ गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरलेले पोलिस केवळ सणासुदीच्या काळातच गरिबांचे धंदे बंद करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिस आयुक्तांच्या तांत्रिक दाव्यांचा समाचार घेताना, हा प्रकार ‘आजारापेक्षा उपचार भयंकर’ असल्याची सणसणीत चपराक त्यांनी लगावली आहे.

कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एकतर पुण्यातली वाढती गुन्हेगारी थांबविण्यात पोलिसांना अद्याप किंचितही यश आलेले नाही. शहरात गुन्हेगारी सतत वाढत असून महिलांना, बालकांना सुरक्षित वातावरण पोलिस देऊ शकत नाहीत. कोयता गँग रोज नव्या ठिकाणी धुमाकूळ घालत आहे. गोळीबाराच्या, लूटमारीच्या, दहशत माजविण्याच्या घटना सर्रास घडत आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अशा परिस्थितीत छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद करून पोलिस प्रशासन नेमकं काय सिद्ध करू पाहत आहे? असा सवाल सुळे यांनी केला आहे.

नेमका प्रतिबंध कशाला?
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पोलिस आयुक्त, जमावबंदी नाही प्रतिबंधात्मक आदेश असे म्हणत आहेत. जर हे असं असेल तर नेमका प्रतिबंध कशाला आहे? महत्त्वाचे म्हणजे फक्त सणांच्या काळातच पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेला नेमका कसा धक्का लागणार आहे? हा तर ‘आजारापेक्षा उपचार भयंकर’ असा प्रकार आहे असे सुळे यांनी म्हटले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात परभणीत महामोर्चा #marathilivenews #breakingnews
00:34
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये FDA-एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; लाखोंचा गुटखा जप्त!
01:13
Video thumbnail
विधान परिषद निवडणुकीपूर्वी आष्टीकरांची सोशल मीडियावरून भूमिका स्पष्ट #marathilivenews #breakingnews
02:12
Video thumbnail
Latur|जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
02:18
Video thumbnail
Latur|RTO कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू
05:29
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषदेत मोठा सस्पेन्स; आष्टीकर ठरवणार गेम?
01:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये 'मृत्यूचा डीव्हायडर'; अपघाताची वाट पाहतेय प्रशासन?
02:18
Video thumbnail
Latur|तुकाराम मुंडेंचा धडाका; लातूरच्या खव्याच्या दुकानांवर FDA ची धाड
02:37
Video thumbnail
parbhani Protest|मसला येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन; मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
02:30
Video thumbnail
माढा तालुक्यातील दारफळ येथील नवभारत विद्यालयात 'प्रवेशोत्सव' व पाठ्यपुस्तक वितरण सोहळा संपन्न!
02:52
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24

Latest news