गुरांसाठीचा जिल्ह्यातला चारा-वैरण राहणार जिल्ह्यातच; जिल्ह्याबाहेर हिरवा, वाळलेला चारा, गवत वाहतुकीस बंदी

परभणी : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे चारा उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी आगामी काळात चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्ह्यात उपलब्ध हिरवा व वाळलेला चारा, गवत व वैरण जिल्ह्यातच राहणार आहे. जिल्ह्यात उपलब्ध हिरवा व वाळलेला चारा, गवत आणि वैरणीची जिल्ह्याबाहेर विक्री व वाहतूक करण्यास बंदी घातली आहे.

सन २०२६ च्या खरीप हंगामात ट्रिगर-१ लागू झालेल्या आणि दुष्काळ जाहीर झालेल्या सर्व तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. परभणी जिल्ह्यातील सर्व 9 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र वैरण आदेश मधील तरतुदींनुसार हा आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पशुधनासाठी उपलब्ध चा-याचे संरक्षण करून संभाव्य चारा टंचाईच्या काळात पशुपालकांना चारा उपलब्ध राहावा, हा या निर्णयाचा उद्देश आहे.

या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा आदेश दि. ६ ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत अंमलात राहणार असल्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47
Video thumbnail
Latur|सूर्या दक्षिण हॉटेल मालकाच्या वक्तव्यावरून MR संघटना आक्रमक | निषेध आणि माफीची मागणी
04:04
Video thumbnail
Latur District Bank|आमचा दृश्यम नव्हे, शुद्ध रामायण” | धिरज देशमुख यांची विरोधकांवर सडेतोड टोला
05:39
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा शंखनाद! बाबासाहेब पाटील, धीरज देशमुख मैदानात
01:40:24
Video thumbnail
LIVE "लातूर बँकेत मोठी राजकीय खेळी! बाबासाहेब पाटील अन् धीरज देशमुख एकत्र!"
01:03:28
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोटातील नागनाथ स्वामी यांचा मृत्यू | पाच दिवसांची झुंज संपली
02:44
Video thumbnail
Latur|मनपात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन | किमान वेतन आणि दिवाळी बोनसची मागणी
03:57
Video thumbnail
Latur Diwali Travel Ticket Rates|खासगी बसकडून अवाजवी तिकीट दर आकारल्यास तक्रार करा | RTO चे आवाहन
02:55
Video thumbnail
Latur Loan Recovery|कर्जवसुलीच्या छळातून आत्महत्येचा आरोप; सावकार शहाणवाज पठाण अटकेत
03:39
Video thumbnail
Nanded Loan Recovery|दुष्काळात कर्जवसुलीला छावा संघटनेचा विरोध | चिंचोली गावातील घटना
04:55

Latest news