लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा लातूरच्या वतीने जिल्हा स्तरीय शिक्षण परिषद, गुरु गौरव पुरस्कार व उपक्रमशिल शाळा यांचा सन्मान सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांत अध्यक्ष मधुकर उन्हाळे प्रांताध्यक्ष हे होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, भाजपा गटनेते रामचंद्र तिरुके, महिला बालकल्याण समितीच्या सभापती शिवकन्या गोडभरले, नगराध्यक्ष शोभाताई आकनगिरे, प्राचार्या भागीरथी गिरी, सभापती भुजंग शिंदे, अंकुश नाडे उपस्थितीत होते. जिल्ह्यातील आदर्श गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, प्राचार्य, प्रशासन अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, प्राथमिक, माध्यमिक अशा ७१ शिक्षकांचा गुरु गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच १२ उपक्रमशील आदर्श शाळेचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र गुरमे यांनी तर सुरेख सूत्रसंचालन अनिता येलमटे यांनी केले. आभार प्रदर्शन अरुणा कांदे यांनी केले.

