21.4 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeमहाराष्ट्रगुलाबी रंग वाजंत्री घालून फिरतात : आव्हाड

गुलाबी रंग वाजंत्री घालून फिरतात : आव्हाड

मुंबई : प्रतिनिधी
अजित पवार यांच्या गुलाबी रंगावरून आव्हाड यांनी खोचक टोला लगावला आहे. आव्हाड म्हणाले की, गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला.
मला जे काम करायला शरद पवार सांगतील ते मी करणार, मी काही मागितले नाही, मी कधी मागणार देखील नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार, १६० पेक्षा जास्त जागा येणार आहेत. बारामतीत युगेंद्र पवार येणार, एक मताने का होईना पण युगेंद्र आमदार होणार असल्याचा दावाही आव्हाड यांनी केला. दरम्यान, अपक्षांना भाजपकडून मोठी ऑफर दिली जात असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, भाजपकडे प्रचंड पैसा आहे, निवडणुकीत त्यांनी कोटींच्या कोटी वाटले, त्यामुळे आताही ते पैसे वाटणार, अपक्ष आमदारांना पैसे देणार, भाजपला अजून काय येतं? असा टोला त्यांनी लगावला.

तुम्ही किती पक्ष बदलले ते बघा
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, नारायण राणे यांना सल्ला आहे, तुम्ही किती पक्ष बदलले ते बघा, तीन पक्ष बदललेल्या माणसाने शरद पवारांना सांगू नये, तुम्ही तुमचं बघा, असा टोलाही त्यांनी लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR