लातूर : प्रतिनिधी
शहरातील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांच्या दोन गटात गु्रपवार होऊन झालेल्या चाकु हल्ल्यात एका आयटीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून तीन विद्यार्थी हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी याच महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यासह त्यांच्या एका मित्राला अटक केली आहे. या आरोपीची शिवाजीनगर ते पोलीस ठाणे पालिसांनी धिंड काढल्याचे व्हिडीओ समाजमाधमावर व्हायरल झाले आहेत.
सोमवारी सायंकाळी ०५.३० वाजण्याचे सुमारास केदार क्षिरसागर, श्रीधर जाधव दोघे रा.शिवली, ता.औसा, प्रणव उदगीरे रा. नळेगाव, ता. चाकुर व सुजल दिंडे रा. दिडेवाडी, ता. कंधार, जि. नांदेड यांनी आकाश पेटकर याची फोडलेली ज्युपीटर दुचाकी ची नुकसान भरपाई (पैसे) मागितल्याचे कारणावरुन व दुपारी ३ वाजण्याचे सुमारास केलेल्या भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादिचे वस्तीगृहाचे गेटसमोरील रोडवर सायंकाळी केदार क्षिरसागर, व प्रणव उदगीरे व सुजल दिंडे यांनी त्यांचे हातातील लाकडी काठीने फिर्यादी व साक्षीदार यांना जिवे मारण्याचे उद्देशाने मारहाण करुन गंभीर जखमी केले तर केदार क्षिरसागर याचा गावचा शिवली येथील मित्र श्रीधर जाधव याने मयत नामे विक्रम नारायण पांचाळ, रा. कुंभारवाडी, ता. रेणापूर यास जिवे मारण्याकरीता त्याचे छातीवर चाकुने वार करुन खुन केला.
या प्रकरणी शिवाजी नगर पोलीसांनी याच शासकीय तंत्रनिकेतनमधील तृतीय वर्षात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्या केदार क्षिरसागर, प्रणव उदगीरे सुजल दिंडे यांच्यासह केदार क्षिरसागर याचा मित्र श्रीधर जाधव यास घटना घडल्यानंतर काही तासाच्या आतच गजाआड केले सदर घटनेचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीसांनी त्यांची शिवाजीनगर पोलीस ठाणे ते घटनास्थळा पर्यंत बुधवारी धिंड काढल्याचे व्हिडोओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्याशी विचारपूस केली असता त्यांनी सदरील घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी घेऊन गेलो होतो असे सांगितले.

