छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
गॅसच्या शेगडीवरून हळूहळू स्वयंपाक आता चुलीवर केला जातोय. संभाजीनगरमध्ये घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत आहे. मात्र व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे हॉटेल चालक गॅसऐवजी लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करण्याकडे वळले आहेत. त्यामुळे आता लाकडांची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने दरही वाढू लागले आहेत. चार-पाच किलोने मिळणारे लाकूड आता आठ तर १२ रुपये किलोने मिळू लागले आहे.
दरम्यान, काँग्रेसने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून गॅस दरवाढ आणि गॅस मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना रांगेत उभे राहावे लागतेय याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केले आहे. संभाजीनगरात दुसरीकडे गॅस सिलिंडर मिळत नसल्याने लाकडांची मागणी वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या दरातही वाढ झाली आहे. ४ ते ५ रुपये किलोने मिळणारे लाकूड आता थेट १२ रुपयांवर पोहोचले आहे.

