26.2 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रगॅस सिलेंडरचा स्फोट; ३ ठार

गॅस सिलेंडरचा स्फोट; ३ ठार

जळगाव : प्रतिनिधी
बेकायदेशीर गॅस रीफिलिंग सेंटर सर्रास सुरू असल्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला. जळगावात कारमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्या घटनेत १० जण गंभीररीत्या भाजले गेले होते. त्यातील तिघांचा उपचार सुरू असताना निधन झाले.

जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात घरगुती खासगी वाहनात गॅस भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन दहा जण गंभीर जखमी झाले होते. जळगावात बेकायदेशीरपणे वाहनात गॅस भरताना स्फोट झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेतील जखमी तिघांचाही उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

जखमी १० पैकी तिघांचा उपचार सुरू असताना वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू झाला. उर्वरित सात जखमींवर पुणे तसेच जळगाव येथे उपचार सुरू आहेत.
रीफिलिंग सेंटर चालक दानिश शेख, भरत सोमनाथ दालवाले व वाहनचालक संदीप सोपान शेजवळ अशी मयत तिघांची नावे आहेत. दोघांचा मुंबईत उपचार सुरू असताना तर एकाचा जळगावातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR