लातूर : प्रतिनिधी
गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूरच्या वतीने गेल्या २९ वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक व समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या सामाजिक कार्याच्या परंपरेचा एक भाग म्हणून समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणा-या समाजबांधवांचा ‘राज्य समाजभूषण’,‘समाजरत्न’ व ‘सन्मान युवा कर्तृत्वाचा’ या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे. तसेच इयत्ता दहावी व बारावीमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवार दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात, लातूर येथे करण्यात आले आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन योगेश बन यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदकुमार गोसावी राहणार आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा वक्ते राहुल गिरी यांचे यावेळी मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. जगदेव गिरी, मुख्य गुप्तवार्ता अधिकारी कल्पना गोसावी, ज्येष्ठ पत्रकार सुखदेव गिरी, प्रा. डॉ. संतोष गिरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपत पुरी, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र गिरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.दरम्यान,पुरस्कार सोहळा अधिक व्यापक व दर्जेदार पद्धतीने पार पडावा, यासाठी कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीस गोसावी समाज प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच निमंत्रित समाजबांधव उपस्थित होते. .
















