ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना राज्य स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी

लातूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील होतकरू क्रिकेटपटूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप २०२६ : ग्रामीण टी-१०’ स्पर्धा यंदा नव्या स्वरूपात रंगणार आहेत. मागील  ३ वर्षांत स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदाच्या स्पर्धेकडे जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. यावर्षी मुलांच्या संघा सोबतच मुलींचे संघदेखील सहभागी होणार आहेत.
दि. २० ते २५ मे २०२६ या कालावधीत दयानंद महाविद्यालय, लातूर येथील क्रिकेट मैदानावर मुलांचे आणि मुलींचे क्रिकेट सामने  दुपारी ३ वाजता सुरू होतील. ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना राज्यस्तरावर पोहोचण्यासाठी सक्षम व्यासपीठ निर्माण व्हावे, हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. मागील ३ वर्षांतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तब्बल १८० गुणवंत खेळाडूंची निवड करण्यात आली असून, त्यांचे एकूण १२ संघ तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक संघात १५ खेळाडूंचा समावेश आहे.
स्पर्धेत सहभागी होणारे संघ पुढीलप्रमाणे- औसा वॉरियर्स, जळकोट टायटन्स, चाकुर चार्जर्स, निलंगा नाईट्स, शिरुर अनंतपाळ स्ट्रायकर्स, लातूर सीटी किंग्स, लातूर लायन्स, देवणी डेअरडेव्हील्स, उदगीर युनायटेड, ग्रामीण इंडियन्स, रेणापूर रॉयल्स, अहमदपूर असॅसिन्स. स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या संघांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच ‘उत्कृष्ट फलंदाज’, ‘उत्कृष्ट गोलंदाज’ आणि ‘उत्कृष्ट क्षेत्ररक्षक’ अशा वैयक्तिक पुरस्कारांनी खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणा-या खेळाडूंचा विशेष संघ तयार करण्यात येणार असून, या संघाला महाराष्ट्र स्तरावरील विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी ग्रामीण टी-१०च्या माध्यमातून पूर्ण सहकार्य करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविणे, त्यांना मोठ्या स्पर्धांचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि लपलेल्या गुणवत्तेला राज्यस्तरावर संधी मिळवून देणे, हा धिरज विलासराव देशमुख यांच्या या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30
Video thumbnail
नोएडामध्ये थरार! हायराईज सोसायटीच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग; अनेक फ्लॅट्सना आगीचा विळखा
00:55
Video thumbnail
'पेड्डी' चित्रपटाच्या यशासाठी जान्हवी कपूर तिरुपतीच्या चरणी; ३,५५० पायऱ्या चढून पूर्ण केली नवसपूर्ती
00:58
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16

Latest news