24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeलातूरग्रामीण भागातील लाडक्या बहिणी रूसल्या 

ग्रामीण भागातील लाडक्या बहिणी रूसल्या 

किनगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक लाडक्या बहिणी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचे अनुदान डिसेंबरपासून खात्यात जमा न झाल्याने या अनुदानापासून वंचित झाल्या असून शासनाच्या विविध नियमावलीचा लाडक्या बहिणींना फटका बसला आहे.
राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जवळपास  वर्ष-दीड वर्षापासून सुरू करण्यात आली असून त्यात विविध नियमावलीचा बडगा लावल्याने व केवायसी करण्यास भाग पाडल्याने अनेक महिलांना ई केवायसी काय असते हेच माहीत नाही त्यामुळे लाडक्या बहिणीचे अनुदान खात्यात जमा न झाल्याने ग्रामीण भागातील  महिला रुसल्या आहेत. मासिक अनुदान १५०० रुपये खात्यात जमा झालेले नाही अनेक लाडक्या बहिणी या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी झाल्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले होते परंतु लाडक्या बहिणीच्या खात्यावरील दीड हजार रक्कम बंद झाल्यामुळे अनेक महिलांना आर्थिक फटका बसला आहे.
 ई केवायसी पूर्ण करताना पोर्टरवरील प्रश्नांचे अचुक उत्तराच्या अभावामुळे तसेच ग्रामीण भागातील महिलांना इंटरनेट साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याने अनेक महिलांनी सेतू सुविधा केंद्र किंवा खाजगी चालकाकडून ई केवायसी घाई गडबडीत करून घेतली कारण राज्यशासनाने ३१ डिसेंबर २०२५ पुर्वी ई केवायसी बंधनकारक केली होती. यावेळी माहिती भरतांना चुकीची माहिती दिली त्यामुळे ख-या गरजू महिलांचे अनुदान बंद झाले आहेत त्यामुळे काय करावे हा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला असून त्यांच्या निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे तेंव्हा राज्य शासनाने गरजू लाभार्थी ‘महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत सामावून घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी महिला वर्गातून चर्चा होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR