23.2 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeलातूरग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडविणारं मतदान केंद्र ठरले मतदारांचे आकर्षण

ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडविणारं मतदान केंद्र ठरले मतदारांचे आकर्षण

लातूर : प्रतिनिधी
निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. या उत्सवात सहभागी होणा-या मतदार राजासाठी उदगीर शहरात अनोखी संकल्पना घेवून अभिनव मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. लाल बहाद्दूर  शास्त्री विद्यालयात उभारलेले हे मतदान केंद्र मतदारांचे आकर्षण ठरले.
मतदानाचा टक्का वाढवा, यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत जनजागृती करण्यात आली. यासोबतच मतदारांना मतदान करणे सुस  व्हावे, यासाठी मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. तसेच सखी मतदान केंद्र, युवा मतदान केंद्र, दिव्यांग संचालित मतदान केंद. यासारख्या विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. तसेच लातूर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एका अभिनव, आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती.
उदगीर येथील लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयात यापैकी एक अभिनव मतदान केंद्र उभारण्यात आले होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार आणि निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या मतदान केंद्रावर महाराष्ट्राच्या ग्रामीण परंपरेचे दर्शन घडविणा-या प्रतिकृती आणि फलक लावण्यात आले होते. ग्रामीण संस्कृती ते आजची आधुनिक जीवनशैली हा प्रवास या फलकाद्वारे उलघाडण्यात  आला. दगडी जाते, पौष्टिक तृणधान्याचे महत्व सांगणारी रांगोळी आणि मिलेट हाऊसची प्रतिकृती, बैलजोडीची प्रतिकृती याठिकाणी ठेवण्यात आली  होती. प्रवेशद्वारापासूनच विविध सजावटीद्वारे ग्रामीण परंपरा आणि  संस्कृतीची माहिती देणा-या या मतदान केंद्रात येणा-या मतदारांना यामुळे ग्रामीण जीवन शैलीची प्रचीती येत होती. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील रेनिसन्स सीबीएसी इंटरनॅशनल शाळेत ‘हरित लातूर’  या संकल्पनेवरआधारित मतदान केंद्र उभारण्यात आले होते. औसा व निलंगा विधानसभा मतदारसंघात वैशिष्ट्यपूर्ण आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. या मतदार केंद्रामुळे मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.
औसा विधानसभा मतदारसंघात औसा येथील पंचायत समिती कार्यालयात वृक्ष  लागवड, वृक्ष संगोपन व वन्यजीव संरक्षण या संकल्पनेतून ‘ग्रीन औसा मतदान केंद्र’ या वैशिष्ट्यपूर्ण अभिनव मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. शिरुर अनंतपाळ येथे युवा संचालित मतदान केंद्र होते. औसा, निलंगा येथील सखी मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली  होती.  औसा विधानसभा मतदारसंघातील लोदगा येथील बांबू मतदान केंद्रावर मतदान केंद्राच्या दर्शनी भागात बांबूची लागवड, बांबू लागवडीचे फायदे, बांबूच्या विविध जाती, बांबूपासून बनविण्यात येणा-या विविध वस्तूंची माहिती फलकाद्वारे मतदारांना देण्यात आली  होती. तसेच बांबूपासून बनविलेले खुर्ची, टेबल, कापड, बडस्, विविध प्रतिकृती आदी वस्तूंचे प्रदर्शन या मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारात मांडण्यात आले
होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR