लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ग्रा.पं.कामगार सेना लातूर यांच्या वतीने राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे व विविध मान्यवरांच्या प्रत्यक्ष सत्कारपर भेट घेऊन ग्रा.पं.कर्मचा-याच्या विविध मागण्यांबाबत निवेदन देऊन मागण्यांबाबत सविस्तर प्रत्यक्ष चर्चा झाली. यावेळी ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या प्रश्नावर लवकरच मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांसोबत होणार प्रशासकीय बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे हे लातूर दौ-यावर आले असता त्यांची महाराष्ट्र् राज्य ग्रा.पं.कामगार सेना लातूरच्या वतीने राज्य सरचिटणीस दयानंदराव एरंडे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष नवनाथराव नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी शिष्टमंडळासह राज्यपाल बागडे यांची प्रत्यक्ष सत्कारपर भेट घेतली व ग्रा. पं.कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत निवेदन दिले. तसेच भाजपाचे मराठावाडा पालक विवेकानंद देशपांडे, अर्चनाताई पाटील चाकूरकर, चंद्रकांत बिराजदार, महेश पाटील या सर्व मान्यवरांची भेट घेऊन ग्रा. पं.कर्मचा-यांच्या विविध मागण्याबाबत निवेदन देऊन सविस्तर चर्चा झाली. दरम्यान आगामी काळात मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्यासोबत प्रत्यक्ष बैठक लावून प्रलंबीत मागण्या, प्रश्न मार्गी लावण्या विषयीचे कामगार सेनेच्या पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळास आश्वासन देण्यात आले आहे.
याप्रसंगी राज्याचे राज्य सरचिटणीस दयानंदराव एरंडे, सुनील फुलारी, लातूर जिल्हाध्यक्ष सतीश मस्के, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद लोभे, जिल्हा सचिव किशोर मसने, जिल्हा सहसचिव मंगेश जाधव, अमोल गायकवाड, नंदकुमार माने, अण्णाराव कांबळे, प्रशांत बाबळसुरे, सोपान कसबे, ज्ञानोबा कांबळे, राम गायकवाड, सुग्रीव कांबळे, इतर जिल्ह्यातून आलेले इतर पदाधिकारी ग्रा.पं.कर्मचारी बांधव उपस्थित होते.

