लातूर : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाने मागच्या काळात एक संस्कृती जोपासली होती. काँग्रेस पक्षाने मराठवाड्याला शंकरराव चव्हाण, डॉ. शिवाजीराव पाटील, निलंगेकर आणि विलासराव देशमुख यांच्या सारखे सुसंस्कृत मुख्यमंत्री दिले. त्यांनी आपले काम करत असताना विरोधकांचाही सन्मान केला. विरोधका सोबतही सामंजस्याची भूमिका घेतली पण आजची राज्याची परिस्थिती पाहिली असता घटनाबा सरकारमधील लोकांची भाषा महाराष्ट्रातील राजकारणाची, राज्यकर्त्यांची भाषा, त्यांची वागणूक पाहिली तर असंच म्हणावं लागतं की कुठं नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा म्हणून आता महाराष्ट्रात परिवर्तन करायचे आहे. अमित देशमुख, धिरज देशमुख हे निवडून येतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त्त करत सत्तेवर असलेल्या घटनाबा महायुती सरकारला पराभुत करुन त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मुरुड, निवळी, एकुरगा जिल्हा परीषद सर्कलमधील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांचा संवाद मेळावा लातूर येथे गुरुवारी १७ ऑक्टोंबर रोजी अनुक्रमे रुक्मिणी मंगल कार्यालय व हॉटेल वाडा येथे घेण्यात आला. त्यावेळी माजी मं९ी दिलीपराव देशमुख बोलत होत.े यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय देशमुख, जागृति शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, अॅड. श्रीपतराव काकडे, काँग्रेस तालुका अध्यक्ष सुभाष घोडके, प्रवीण पाटील जनार्दन वंगवाड, राजकुमार पाटील, अनुप शेळके, हरिराम कुलकर्णी सचिन दाताळ, दैवशाला राजमाने, संभाजी सुळ, बाळासाहेब कदम, रामदास पवार, शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते
सत्ताधा-यांनी विरोधकांची घरे माणसं फोडली
आगामी विधानसभा निवडणुकीत नुसते मतदान करायचं नाही तर मतदाराला मतदानासोबत न्यायदानसुद्धा करायचा आहे. हे न्यायदान जनतेच्या अदालतीमध्ये होणार आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, जनाबाई या संतांनी नैतिक शिकवण महाराष्ट्राला दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे नैतिकतेचे योगदान आहे. हा वारसा, विचार सांभाळले पाहिजे, मात्र सत्तेवर असलेल्या महायुती सरकारने विरोधकांची घरे फोडली. माणसे फोडली, शिवसेना फोडली आता या मंडळीचा देशाची आर्थिक राजधानी असणा-या मुंबईवर डोळा आह.े त्यामुळें येणा-या विधानसभा निवडणुकीत या सरकारचा हिशोब करण्याची गरज आहे. हे दुरुस्त होण्यासारखे नाही, अता केवळ फसव्या घोषणा देवुन लोकांची दिशाभूल करणारी मंडळी सत्तेत बसल्याने अडीच वर्षात सर्वच समाजात तेढ निर्माण कसे होईल याकडे सरकारचे जास्त लक्ष असून हे आपण बारकाईने विचार करण्याची गरज आहे. त्याचा सगळा हिशोब विधानसभा निवडणुकीत करा. महायुती सरकारला पराभुत करा, असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.
विकासाची विणा खाली ठेवणार नाही
लोकनेते विलासराव देशमुख यांनी गेल्या ५० वर्षांपूर्वी विकासाची विणा खांद्यावर घेतला आहे. त्यांनी या भागांत विकासाची दिशा देण्याचे काम केले. या भागात विकासाचे स्वप्न बघितले ते पूर्णत्वाकडे घेवून गेल.े पण विकास थांबत नाही शेवटच्या माणसाचा विकास होईपर्यंत ती विकासाची विणा आम्हीं खाली ठेवणार नाही, असे सांगून ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मागच्या पाच वर्षात धीरज देशमुख यांनी विविध विकासकामे मार्गी लावले. अनेक कामे पूर्ण झाली काही प्रगतीपथावर असल्याचे सांगून लवकरच मुरुड तालुका होण्याच्या प्रक्रियेत आहे. यासाठी धीरज देशमुख यांनी स्वत: लक्ष घालून अनेक शासकीय कार्यालये, वैद्यकीय सुविधा, बसस्टँड यासारखे विविध चांगली काम केली आहेत. लवकरच ग्रामीण भागातील लोकांच्या सोयीसाठी अप्पर तहसील येथे सुरु करण्यात येईल. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार धीरज देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अधिक मताधिक्य द्यावे, असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.
यावेळी विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, विश्वनाथ पाटील, अनंतराव येलगटे, भैरवनाथ सूर्यवंशी, निलकंठ बचाटे, दयानंद बिडवे, रामराव ढगे, साजिद पटेल, नानासाहेब जाधव, गोविंद कदम, रघुनाथ शिंदे, गुरुनाथ गवळी, अनिल पाटील, तुकाराम गोडसे, बाळासाहेब बिडवे यांच्यासह मुरुड, अकोला, एकुर्गा, चाटा, साखरा येथील काँग्रेसचे पदाधिकारी बाजार समिती, मांजरा साखर कारखाना, विलास साखर कारखान्याचे संचालक उपस्थित होते.