21.7 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeमहाराष्ट्रघड्याळ नव्हे तर कपड्यावरून पटली अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख

घड्याळ नव्हे तर कपड्यावरून पटली अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख

पुणे : प्रतिनिधी
अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांची ओळख त्यांच्या हातावरील घड्याळावरून पटली असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पोलिस तपासात नेमकी त्यांची ओळख कशावरून पटली, याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
वरिष्ठ पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला अजित पवारांची ओळख त्यांच्या हातातील घड्याळामुळे पटली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण अजित पवारांची ओळख त्यांच्या हातावरील कुर्त्याच्या कापडामुळे पटल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या उजव्या हातावरील कुर्त्याच्या (शर्टच्या) कापडामुळे त्यांची प्रथमदर्शनी ओळख पटली. प्रत्यक्षात त्यांच्या डाव्या हातावर जे घड्याळासारखे दिसत होते, तो त्यांच्या शर्टचाच एक भाग होता, अशी मोठी माहिती समोर आली आहे. कापडावरून झालेली ही ओळख प्राथमिक होती. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि पूर्णपणे खात्री पटवण्यासाठी प्रशासनाकडून डीएनए चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांची ओळख पटवण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR