जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील घोणसी येथील शेतरस्ता पाच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर खुला झाला आहे. घोणसी येथील शेतक-यांनी २०२१ मध्ये शेत रस्त्याची मागणी केली होती. जळकोटचे तहसीलदार यांच्याकडे शेतकरी सरिता घोणसिकर, विष्णुकांत मालुसरे, रमेश मालुसरे, प्रकाश लोकरे, माधव मालुसरे व्यंकट बिरादार, गणेश बिरादार ,रमेश बिरादार, बालाजी बिरादार ‘ सूर्यकला मालुसरे ‘पांडुरंग मालुसरे, बालाजी मालुसरे, गोविंद मालुसरे, नामदेव मालुसरे, तुळशीराम बिराजदार, राम पाटील यांनी अर्ज देऊन रस्त्याची मागणी केली होती. जळकोटचे तहसीलदार यांनी या रस्त्याची रीतसर पाहणी करून या रस्त्याबाबत घोणसी मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून हा रस्ता खुल्या करण्याचे आदेश दिले होते
उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे व जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जळकोट तहसील चे निवासी नायब तहसीलदार संतोष गुट्टे, घोणसी विभागाचे मंडळ अधिकारी पंडित जाधव, जळकोटचे पोलीस निरीक्षक राजेश चव्हाण घोणशी येथील ग्राममहसूल अधिकारी महादेव पाटील, उपाधीक्षक भूमी कार्यालयाचे निमतनदार रहमान सिद्दीकी, पोलीस हेडकॉन्स्टेबल हरणे यांनी रीतसर मोजणी करून चुना टाकून खुणा केल्या व त्यानंतर दोन जेसीबीच्या साह्याने रस्ता अतिक्रमणमुक्त केला. यावेळी सचितानंद घोणसे , बालाजी पाटील, प्रकाश लोकरे, नामदेव मालसुरे, माधव मालुसरे, जीवन जानतिने, ज्ञानेश्वर मालुसरे, सोमेश्वर परगे, नारायण मालुसरे, राम मालुसरे, रमेश मालुसरे, राहूल मालुसरे, अमोल मालुसरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रस्ता अतिक्रमण मुक्त झाल्याबद्दल शेतक-यांनी आनंद व्यक्त केला आहे.