27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeअंतरराष्ट्रीयचंद्रावर उभारणार एआय सॅटेलाईट फॅक्टरी

चंद्रावर उभारणार एआय सॅटेलाईट फॅक्टरी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क चंद्रावर एआय सॅटेलाइट फॅक्टरी उभारणार आहेत. या माध्यमातून त्यांना सूर्याची ऊर्जा कॅप्चर करायची आहे. मस्क यांनी त्यांच्या एआय कंपनी एआयच्या अंतर्गत बैठकीचा ४५ मिनिटांचा व्हीडिओ पोस्ट केला, ज्यात ही माहिती समोर आली.

मस्क सूर्याच्या एकूण ऊर्जेचा १ टक्का भाग वापरू इच्छितात. ऐकायला हा १ टक्का भाग लहान वाटतो. पण तो आजच्या जगाच्या एकूण ऊर्जेपेक्षा लाखो पटीने जास्त असणार आहे. अंतराळात आपण एकटे नाही. त्यांना इतर ग्रहांवर एलियन्सचे (परग्रहवासीयांचे) अवशेष आणि तेथे कधीकाळी अस्तित्वात असलेल्या प्राचीन संस्कृतींचे अवशेष (भग्नावशेष) शोधायचे आहेत, असेही मस्क यांचे म्हणणे आहे.

यासाठी चंद्रावर कारखाने उभारले जाणार आहेत, असे मस्क यांचे म्हणणे आहे. जे एआय सॅटेलाइट्स (कृत्रिम बुद्धिमत्ता उपग्रह) बनवतील तिथे एक मास ड्रायव्हर (एक प्रकारचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाँचर) असेल जो सॅटेलाइट्सना अंतराळात सोडेल. मस्क यांच्या मते याच्या मदतीने असे एआय क्लस्टर (कृत्रिम बुद्धिमत्ता समूह) तयार केले जाऊ शकतात, जे सूर्याच्या एकूण ऊर्जेचा मोठा भाग कॅप्चर करू शकतील आणि इतर आकाशगंगांपर्यंत विस्तार करू शकतील.

यासंदर्भात झालेल्या बैठकीत मस्क यांनी सांगितले की, कंपनीतून अनेक जुन्या कर्मचा-यांना काढून टाकण्यात आले आहे. यात कंपनीची सुरुवात करणा-या फाउंडिंग टीमचे सदस्यही समाविष्ट आहेत. एआयची सुरुवात करणा-या १२ मुख्य सदस्यांपैकी आता फक्त अर्धेच मस्क यांच्यासोबत राहिले आहेत. मस्क यांनी याला कंपनीच्या ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरमधील बदल असे नाव दिले आहे.

हा प्रकल्प केवळ सामान्य सॉफ्टवेअर तयार करणार नाही, तर संपूर्ण कंपन्यांचे डिजिटल सिम्युलेशन तयार करेल. याचा अर्थ असा आहे की, एआय कंपनीच्या प्रत्येक विभाग, सप्लाय चेन आणि व्यावसायिक निर्णयांचे एक कॉम्प्युटर मॉडेल तयार करेल. यामुळे कोणताही मोठा निर्णय प्रत्यक्षात लागू करण्यापूर्वी एआयवर त्याची चाचणी करता येईल की त्याचे परिणाम काय असतील. मॅक्रोहार्डचे एक मोठे उद्दिष्ट एआयच्या मदतीने जटिल मशीन डिझाइन करणे आहे. हे एआय इतके प्रगत असेल की ते स्वत:च रॉकेटचे इंजिन आणि त्यांच्या भागांचे डिझाइन तयार करेल, ज्यामुळे मानवी चुकांची शक्यता संपुष्टात येईल आणि कामाचा वेग अनेक पटींनी वाढेल.

सॉफ्टवेअर स्वत:
प्रोग्राम लिहिणार
एआय मॉडेल्स कोणतीही समस्या एका अनुभवी अभियंत्याप्रमाणे समजतात. जर प्रोग्राममध्ये काही चूक आली, तर ते ती शोधून स्वत:च दुरुस्त करू शकतात. या वर्षाच्या अखेरपर्यंत कदाचित कोडिंग लिहिण्याची गरजच पडणार नाही. एआय थेट बायनरी (संगणकाची स्वत:ची भाषा म्हणजे ० आणि १) मध्ये फाइल्स तयार करेल. हे काम कोणत्याही मानवी प्रोग्रामर किंवा सध्याच्या सॉफ्टवेअर (कंपाइलर) पेक्षा किती तरी पटीने चांगले आणि जलद असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR