Homeलातूरचलन तुटवड्याने बँकांची अडचण; नागरिकांची गैरसोय

चलन तुटवड्याने बँकांची अडचण; नागरिकांची गैरसोय

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील सहकारी, खाजगी सर्वच बँकांमध्ये चलन तूटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे व्यवहार करताना बँकांची अडचण तर नागरिकांची गैरसोय होत आहे.  एसबीआय ही बँक लातूर जिल्ह्याची चेस्ट बँक आहे. या बँकेकडून जिल्ह्यातील सर्वच बँकांना चलन पुरवठा केला जातो. परंतू, गेल्या दोन-तीन दिवसांपासून चलन तूटवडा निर्माण झाला आहे. एसबीआय बँकेकडून दररोज भारतीय रिजर्व बँकेकडे चलन पुरवठ्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. मात्र, भारतीय रिजर्व बँकेकडूनच चलन पुरवठा होत नाही. कारण काय आहे, माहित नाही. परंतु, भारतीय रिजर्व बँकेकडून चलन पुरवठा केला जात नाही, असे एसबीआय बँकेकडून सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR