चलो मुंबई… जरांगेचा नारा!

बीड : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टला चलो मुंबई, असा नारा देत, मराठा बांधवांना मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे कूच करण्याचे आवाहन केले आहे. याच बरोबर, कुठलेही कारण न सांगता, शेतकरी, चालक, वाहक, वारकरी आदी सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असेही जरांगे यांनी म्हटले आहे.

याशिवाय, त्यांनी मराठा बांधवांना, असतील त्यांनी पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिका सोबत घ्या. किमान ५००० पाण्याचे टँकर आणि १००० रुग्णवाहिका सोबत असाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ते अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलत होते.

जरांगे म्हणाले, शेतकरी असेल, व्यवसायिक असेल, ट्रकवर असेल, बसवर ड्रायव्हर कंडक्टर असेल, महाराज मंडळी असतील, वारकरी असतील, टाळकरी, गायक, वादक, या सर्वांनी यावेळी तुटून पडावे. सगळे जण मुंबईकडे निघा आता, कुणी शेतीचे कारण सांगू नका, कुणी नोकरीचे कारण सांगू नका, डॉक्टर-वकिलांनी सांगू नका सर्वांनी तयारीने चलायचे आहे.

विशेष करून आज पासून महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सांगतो की, जेथे-जेथे पाण्याचे टँकर असतील, ते सोबत घ्या आपल्या मुलांना पिण्याचे पाणी लागेल. जेजे डॉक्टर बंधव ही प्रेस ऐकत आहेत, त्यांनाही माझी विनंती आहे की, त्यांनीही अँब्यूलन्स आणि औषधी सोबत घ्यावी. १००० हून अधिक अँब्यूलन्स हव्यात आणि ५००० हून अधिक पाण्याचे टँकर हवेत. मी सांगितले आहे, ५००० हून अधिक पाण्याचे टँकर घ्याचे आणि तेथे एकही नसले, तर तुम्ही म्हणाल, ५००० हजार टँकर सांगितले आणि येथे एकही नाही. माझ्याकडे काय कंपनी आहे का? जिल्ह्या जिल्यातील आपल्या बांधवांना हे घडवून आणावे लागणार आहे, असे जरांगे म्हणाले.

जरांगे पुढे म्हणाले, याच बरोबर मी आणखी चार आवाहणे केली आहेत. शिक्षक असतील, वकील असतील, डॉक्टर असतील आणि श्रीमंत राजकारणी मराठे असतील, यांनी आपापली वाहने बाहेर काढावीत, असे मी म्हटले आहे. तुम्हाला नोकरीवर जायचे तर जा, पण आपली वाहने बाहेर काढा. तुम्ही आम्हाल केवळ तीन दिवस साथ द्या. २७,२८ आणि २९ तारखेला आम्ही मैतानावर बसलो की तुम्ही परत या हवे तर. तुम्ही थांबू नका.

मराठा समाजाला खरे बोलायला हवे, आम्हाल खोटे होलून कुणालाही मुंबईत न्यायचे नाही. सर्वांनी मुंबई कडे चलायचे आहे. आपापली वाहने घेऊन. आम्ही तेथे बसल्यानंतर तुम्ही आम्हाल आशीर्वाद द्या आणि परत या. ही सर्व महाराष्ट्रातील मराठ्यांना विनंती करतो. आपण संपूर्ण शक्तीनीशी यात उतरल्याशिवाय पर्याय नाही. फक्त एकच सांगतो की मला आंदोल शांततेत हवे आहे. कुणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही. नसता त्याने आमच्यासोबत यायचे नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31

Latest news