24.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रचाकणकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; २ अटकेत

चाकणकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; २ अटकेत

पुणे : प्रतिनिधी
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबाबत अश्लील पोस्ट करणा-या दोघांना अटक करण्यात आली आहे. सनी पारखे आणि जगन्नाथ हाटे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

सनी पारखेला गंगापूर तर हाटे याला चुनाभट्टी मुंबई येथून अटक केली आहे. ठाणे पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने ही कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकर यांच्याबाबत इन्स्टाग्राम आणि फेसबुक अशा सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात असल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी सायबर पोलिसांकडे ३२ जणांची लिस्ट सायबर क्राईम विभागाकडे देण्यात आली होती.

अटक करण्यात आलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत समाजमाध्यमात अश्लील मजकूर पोस्ट करणा-यांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली होती.

फेसबुक कंपनीकडून संबंधित अकाऊंटची माहिती घेण्यात आली. फेसबुक कंपनीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वसंत खुळे (वय ३४) याला परभणी जिल्ह्यातील रहाटी तालुक्यातून अटक केली. त्याचा फोन जप्त केला. त्याचा जबाब नोंदवून घेत त्याच्यावर नोटीसही देण्यात आली.

याशिवाय, फेसबुक युजर प्रदीप कणसे नावाने रुपाली चाकणकरांच्या पोस्टवर काही अश्लील कमेंट्सही करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी हे अकाऊंट वापरणा-याचा मोबाईल नंबर मिळवून त्याच्यावरही कारवाई करत त्यालाही नोटीस बजावली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR