23.5 C
Latur
Thursday, January 15, 2026
Homeलातूरचाकूरचे साईंनंदनवनम बनले कृषी पर्यटन आणि हुरडा पार्टीचे केंद्र

चाकूरचे साईंनंदनवनम बनले कृषी पर्यटन आणि हुरडा पार्टीचे केंद्र

चाकूर : प्रतिनिधी
चाकूर येथील सुप्रसिध्द साईनंदनवनम मध्ये हूरडा पार्टीची जोरदार सुरूवात झाली असून हे स्थळ कृषी पर्यटकांसाठी अस्सल गावरान मेजवानी ठरत असल्याची माहिती साईनंदनवनचे संचालक विशाल उत्तमराव जाधव यांनी दिली आहे.
शेतात ज्वारीची कणस डौलात डोलायला लागली की सर्वांना वेध लागतात ते हुरडा पार्टीचे, ज्वारीचा दाणा कोवळा हिरवा असला की सुरुवात होते ती हुरड्याची. साधारणत: पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागात हुरडा पार्टीचे प्रमाण खूप पाहायला मिळते. यावेळी लोक दिवस दिवस रानात फिरून कोवळी ज्वारीची कणसं खास हूर्ड्यासाठी निवडतात तर काही लोक खास आवर्जून हुर्ड्यासाठी ज्वारीच्या पिकाची पेरणीही करतात. साधारणत: डिसेंबर सुरू झाला की हुरडा पार्टीला सुरूवात होते. ते थेट फेब्रुवारी महिनापर्यंत हूर्डा पार्टीसाठी योग्य कालखंड असतो. शेतात जाऊन मस्त हुरडा पार्टी करण्याची मजाच काही वेगळी असते. त्यानिमित्त रानात फिरणे होत आणि कित्येक लोकांची छोटीशी ट्रीप सुद्धा होते. अशावेळी वृन्दावंन कृषी पर्यटन चाकूर येथे ही हुरडा पार्टी करण्याची मजाच वेगळी असते.
पहिल्यांदा जमिनीत एक आकटी केली जाते. ज्याला सरळ भाषेत एक छोटासा खड्डा म्हणतात तर ही आकटी केल्यानंतर त्यामध्ये शेणाच्या गोव-या पेटवून विस्तव तयार केला जातो. आग पूर्ण शांत झाल्यावर जो विस्तव पेटता राहतो त्यामध्ये ही कोवळी ज्वारीची कणसे भाजली जातात. ती योग्य प्रकारे भाजली जावी याची काळजी घ्यावी लागते. भाजलेली कणसे हातावर चोळून त्यातील भाजलेली ज्वारीचे कोवळे दाणे म्हणजे आपला हुरडा. त्यासोबत चवीने खायला गूळ, शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी, लसणाची चटणी, असे विविध प्रकार घेतले जातात. त्यामुळे चवीने खावा असा हुरडा होतो. यासोबतच चुलीवर केलेली भाकरी आणि भाजी असते. वृन्दावंन हुरडा पार्टीमध्ये दिवसभराचा पॅकेज उपलब्ध असतो त्यात सकाळी आगमन झाले की उसाचा ताजा रस दिला जातो. त्यांनंतर नाश्त्याला पोहा, चिवडा, पेरू, व इतर फ्रुट दिले जातात. त्यांनंतर हुरडा कणीस भाजून त्यासोबत विविध चटण्या, मठ्ठा, भाजलेले वांगे, कांदा असे दिले जाते नंतर दुपारी जेवणामध्ये चुलीवर केलेले पिटल, वरण, वांग्याची काळ्या मसाल्यातील भाजी, गव्हाची खीर, कडक बाजरी व ज्वारी ची भाकरी पापड , भात, दही, ठेचा असा मेनू दिला जातो. दिवसभर आंबा व चिक्कूच्या बागेत लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी व इतर बरेच खेळणीही आहेत. संध्याकाळी चहा सोबत कांदाभजी देऊन  एकदिवसीय हुरडा पार्टीचा समारोप होतो.
या माध्यमातून ग्रामीण महिला व पुरुषाना रोजगार निर्मिती, महाराष्ट्रीन खाद्य संस्कृति ,घोड़ा बग्गी आकर्षण ,शिवार फेरी, आधुनिक पर्यटना सोबत कृषि पर्यटन असलेले एकमेव महाराष्ट्रतील ठिकाण, जगप्रसिद्ध शिवालय मंदिर, सत्यसाईं बाबाचे जगातील एकमेव मंदिर, वॉटर पार्क, राहण्यासाठी उत्कृष्ट सूट रूम, डिलक्स रूम, टू बीएच के व्हीला, सुप्रसिद्ध केशर अम्बा, ड्रैगन फ्रÞूट, पेरू, चिक्कू फळबाग आदींमुळे निसर्ग सौंदर्य आणखीनच वाढले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR