चाकूरसह परिसराला पावसाने झोडपले

 चाकूर : अ.ना.शिंदे
दिंनाक २७ ऑगस्ट रोजी बुधवारी रात्री सायंकाळी पाचच्या सुमारास सुरू झालेला पाऊस मुसळधार पाऊस रात्रभर सुरू होता. तर आज गुरुवार २८ ऑगस्ट रोजी सकाळ पासुनच मुसळधार पावसाने लातूर जिल्ह्यात हजेरी लावली. चाकूर तालुक्यात चाकूरसह परिसरातील सर्व गावांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे नदी,नाले आणि ओढे तुडूंब,नागरिकांच्या राहत्या घरात पाणी शिरले आहे. अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले आहे. सतत होणा-या पावसामुळे नागरिकांची पंचाईत झाली असुन सर्वत्र एकच धावपळ उडालेली आहे. या पावसाने नदी काठाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.घरणी नदीला पुर आला असुन पुलावरून पाणी वाहत आहे.या पुरामुळे नदीकाठच्या शेतीत पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

टाकळगावातील १० ते १५ घरात पाणी शिरले आहे.शेळगाव जवळील तिरू नदीला पुर आला आहे.तसेच बोथी,राचन्नावाडी येथील नद्या तुंडूंब भरून वाहत आहेत. नायगाव , हिंपळनेर ,हानमंत जवळगा या भागातील नद्याना पुर आला आहे. झरी,जानवळ या भागातही नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. सुगाव गावात पावसाचे पाणीच पाणी झाले असुन घरात पाणी शिरले आहे.

नळेगाव जवळील उदगीर रोडवर पाणी साचल्याने वाहतूक खोळबंली होती. आटोळा, तिवघाळ, तळघाळ, उजळंब, रोहीणा या भागातही आढे-नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. तालुक्यात मुसळधार पावसाने अनेक गावात घरांची पडझड झाल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान या पावसाने चाकूर शहरातील उजळंब रोडवरील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे.चाकूर व परिसरात अनेक गावात विजांच्या कडकडासह पाऊस झाला. दरम्यान वीज गुल आणि रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

उजळंब रोडवरील अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांना घरातील पाणी उपसण्याची वेळ आली. तर काहींना घरातील पाणी बाहेर काढून देण्याची वेळ आल्याने लहान बालके आणि महिलांना त्रास सोसावा लागला आहे.चाकुरातील लक्ष््मी नगर,बौध्द नगर, सुतार वाडा,पेट मोहल्ला, धनगर वाडा या भागाला व तेथील परिसराला तलावाचे स्वरुप आले आहे.नाल्या तुडुंब भरून वाहल्याने ते पाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news