31.1 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeलातूरचाकूर : गटातून ४१ तर गणातून ७३ नामनिर्देशनपत्र वैध

चाकूर : गटातून ४१ तर गणातून ७३ नामनिर्देशनपत्र वैध

चाकूर : प्रतिनिधी
जि. प. व पं.स. निवडणुकीसाठी झालेल्या उमेदवारांच्या अर्जाच्या छाननीत जिल्हा परिषद गटातून ४१ उमेदवारी अर्ज तर पंचायत समीती गणातून ७३ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत., अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संगीता टकले आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार नरसिग जाधव यांनी दिली.
जिल्हा परिषद ५ गटासाठी व पंचायत समितीच्या १० गणासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या उमेदवारांने मोठे शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्या कडे दाखल केला. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदच्या ५ जागांसाठी ५९ अर्ज तर पंचायत समितीच्या दहा जागांसाठी ९२ असे १५१ अर्ज दाखल झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सृंगीता टकले यांनी सांगितले. चाकुर येथील तहसील कार्यालयात अर्ज भरण्यासाठी उत्स्फूर्त गर्दी दिसली. चाकूर तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेस ,भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा गट, असे सध्या तर चित्र दिसत आहे. तर भारतीय जनता पार्टीचे अधिकाधिक जागेवर उमेदवार उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तसेच काँग्रेस पक्षानेही अनेक ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत.
मनसेने एकाही जागेवर उमेदवारी अर्ज भरला नाही तर अपक्ष व बंडखोर यांनी अनेक ठिकाणी अर्ज दाखल केले. पाचही गटांमध्ये अटीतटीच्या लढती होणार  आहेत. चापोली गटातून सौ. रंजना चाटे -राष्ट्रवादी काँग्रेस, सुमन लोणाळे -भाजप, नळेगाव अनिल चव्हाण -काँग्रेस, अमर पाटील -भाजप, शिवाजी काळे -राष्ट्रवादी काँग्रेस, वडवळ नागनाथ -अशोक चिंते -भाजप, अ‍ॅड. माधव कोळगावे -काँग्रेस, भानुदास पोटे -राष्ट्रवादी काँग्रेस, रोहिणा गटातून सुप्रिया शिगांरे-भाजप, उषा कांबळे राष्ट्रवादी -काँग्रेस, सोनिया नाईकवाडे -काँग्रेस, जानवळ गटातून दयानंद सुरवसे -राष्ट्रवादी काँग्रेस, नागनाथ पाटील -काँग्रेस, रमाकांत साबदे -भाजप यांच्यात लढत होत आहे. दिं २७ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतरच तिरंगी, चौरंगी लढत होईल. तसेच पंचायत समितीसाठीही तुल्यबळ लढत  होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR