चाकूर, जळकोट, अहमदपूर गटांतील  सत्ताधारी पॅनलचे उमेदवार बिनविरोध?

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक 
लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिका-यांनी अर्ज बाद ठरवल्याने १३ उमेदवारांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते. या १३ ही उमेदवारांच्या अपिलावर सुनावणी घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांचा निर्णय कायम ठेवत सर्वांचे अपील फेटाळण्यात आले. त्यामुळे चाकूर गट, जळकोट गट, अहमदपूर गट, महिला गट आणि इतर मागासवर्गीय गटातून विरोधी पक्षाचे अर्ज बाद ठरले. त्यामुळे काँग्रेस सत्ताधारी पॅनलची या गटांतील उमेदवारांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यात छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके यांनी उमेदवारी अर्ज बाद केलेल्या १३ उमेदवारांनी येथील विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्याकडे अपील केले होते. गेल्या काही दिवसांपासून या अपिलावर सुनावणी सुरू होती. यात आता १३ ही उमेदवारांच्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेला निर्णय कायम ठेवत अपील फेटाळण्यात आले.
अर्ज छाननीच्या वेळी संस्था थकबाकीदार असल्याने चाकूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील गोविंद माकणे, संस्थेवर संचालक नसल्याने अहमदपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व महिला प्रतिनिधी मतदारसंघातील अबोली विनायक पाटील, संस्था थकबाकीदार असल्याने जळकोट मतदारसंघातील धर्मपाल देवशेट्टे, बँकेचे थकबाकीदर असल्याने हाऊसिंग मतदारसंघातील सतीश शेषेराव जाधव, जिल्हा बँकेच्या खात्यावर संस्थेचा व्यवहार नसल्याने प्रक्रिया मतदारसंघ व इतर मागासवर्गीय मतदारसंघातील भरत चामले, लेखा परिक्षणातील वर्गवारी नसल्याने पतसंस्था मतदारसंघातील भीमाशंकर राचट्टे, हार्वेस्टरचे कर्ज थकीत असल्याने निलंगा मतदारसंघातील वामनराव पाटील, लेखा परीक्षण वर्गवारी नसल्याने प्रक्रिया मतदारसंघातील सचिन सुभाष पाटील, मतदार यादीत सभासद नसल्याने अनुसूचित जाती मतदारसंघातील राणी शिवलीकर यांचा उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी यांनी बाद केला होता. या सर्वांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते. ते सर्वच अपील फेटाळण्यात आले. त्यामुळे या गटांमधील सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43
Video thumbnail
Solapur Well Collapse: आंबे गावात विहीर खचली; चार जण मातीखाली अडकले, बचावकार्य सुरू
01:16
Video thumbnail
Latur Accident News: टाका पाटीजवळ भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
00:41
Video thumbnail
Latur Bank Election : लातूरचा मतदार सन्मान गहाण ठेवणारा नाही – आमदार अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य
05:40
Video thumbnail
Latur District Bank Election: योग्य उमेदवाराला मतदान करा – दिलीपराव देशमुखांचे आवाहन
01:10
Video thumbnail
Nanded News: आंतरपिकात गांजाची लागवड; 9 लाख 24 हजारांचा गांजा जप्त, किनवटमध्ये LCB ची कारवाई
00:43
Video thumbnail
Latur District Bank Election: धमक्या, द्वेषाशिवाय विरोधकांनी काही केलं नाही – धीरज देशमुखांचा प्रहार
04:38
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59

Latest news