21.7 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeलातूरचाकूर तालुक्यात ७४ नामनिर्देशन पत्रांची विक्री

चाकूर तालुक्यात ७४ नामनिर्देशन पत्रांची विक्री

चाकूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चाकूर तालुक्यात पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी ७४ नामनिर्देशन अर्ज घेल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
चाकूर तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गण आहेत.जल्हिा परिषद तसेच पंचायत समितीच्या विविध गट व गणांसाठी निवडणूक लढविणा-या इच्छुक उमेदवारांनी शुक्रवारी ७४ नामनिर्देशन अर्जाची खरेदी केली आहे. यामुळे ऐन थंडीत निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारी १६ जानेवारी पासून सुरू करण्यात आली असून, २१ जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकृती केली जाणार आहे. उर्वरित काही दिवसांत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
२२ जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. छाननीनंतर वैद्यरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येवून २३ जानेवारी ते २७ जानेवारीपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्याचदिवशी निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशाणी वाटप करणार असून ५ फेब्रुवारी २०२६ गुरुवारी मतदान होणार आहे. दोन दिवसांनी ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण व पारदर्शक राबविण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संगिता टकले आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी नरसिंग जाधव यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR