21.6 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeलातूरचाकूर बाजारपेठ बंद ठेवून पाळला दुखवटा

चाकूर बाजारपेठ बंद ठेवून पाळला दुखवटा

चाकुर : प्रतिनिधी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चाकुरचे भुमिपुञ शिवराज पाटील चाकुरकर यांना चाकूर शहरातील शैक्षणिक संस्था, सहकारी सोसासटी, विविध सामाजीक संघटना, विविध राजकिय पक्षाच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यांत आली. तसेच संपुर्ण चाकूर बाजारपेठ बंद ठेवुन या दुखद घटनेत चाकूर वासीय सहभागी होऊन दुखवटा पाळण्यात आला.
चाकूर नगर पंचायतीत भावपूर्ण श्रद्धांजली
चाकुरचे भुमिपुञ, देशाचे माजी गृहमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष, पंजाबचे माजी राज्यपाल, मूल्याधिष्ठित, तत्त्वनिष्ठ आणि एकनिष्ठ राजकारणाचे मूर्तिमंत उदाहरण आणि देशाचे नेते शिवराज पाटील चाकूरकर, आज काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या जाण्याने एक कोहीनुर हिरा हरपला आहे. धर्मनिरपेक्ष मूल्यांचे ते बुलंद प्रतीक होते. अशा शब्दात नगराध्यक्ष करीमसाब गुळवे यांनी नगर पंचायतीत श्रद्धांजली वाहिली. यावेळी उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे, नगरसेवक भागवत फुले, नगरसेवक नितीन रेड्डी, राम कसबे, सिध्देश्वर पवार, गंगाधर केराळे, संदीप शेटे, संजय पाटील, रवींद्र निळकंठ, उमाकांत शेटे, राम पाटील, गुडूसाब पटेल आदी उपस्थित होते.
चाकूरच्या सहकारी सोसायटीत श्रद्धांजली
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर अभ्यासू, सुसंस्कृत आणि स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी भारतीय राजकारणात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. सुमारे पाच दशकांचा संसदीय व प्रशासकीय अनुभव, विविध मंत्रालयांमधील कामकाज आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून केलेले उल्लेखनीय योगदान यामुळे ते देशाच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाचे व आदरणीय नेते होते.असे सोसायटीचे चेअरमन डॉ. गोविंदराव माकणे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले. यावेळी सोसायटीचे सर्व संचालक व शेतकरी सभासद सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते.
वडवळ ना. येथे अभिवादन
वडवळ नागनाथ ग्रामपंचायत व ग्रामस्थच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना समस्त गावकरींच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी उपसरपंच बालाजी गंदगे, शिवसेनेचे विवेकानंद लवटे, चेअरमन उमाकांत आचवले, माजी सरपंच राजकुमार बेंडके, सामाजिक कार्यकर्ते नरसींग भुरे, धर्मराज मोतीपवळे, गिरीधर भेटे, सतीश चंदे, गणेश निटुरे, राजकुमार आष्टके, मनोहर भुरे, बेरकीळे लक्ष्मण, हनमंत बरले, दस्तगिर शेख, गोरख खरटमोल, सुरेश कसबे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन केले.
संजीवनी महाविद्यालय, चापोली
भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे दु:खद निधन झाले त्याबद्दल चापोली येथील संजीवनी महाविद्यालय परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी डॉ. धनंजय नारायणराव चाटे, संस्था सचिव तथा चापोलीचे लोकनियुक्त सरपंच डॉ.भालचंद्र चाटे सह प्राध्यापक उपस्थित होते.
रोहिण्यात भावपूर्ण श्रध्दांजली
महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राच्या शालीनता, सुसंस्कृततेचा लौकिक जपणारे आणि राष्ट्रीय-आंतरराष्टीय पर्यंत पोहचविणारे नेतृत्व म्हणून चाकुरचे सुपुञ  ज्येष्ठ नेते कै. शिवराज पाटील चाकुरकर सदैव स्मरणात राहतील अशा शब्दांत चाकुर येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सभापती वंसतराव डिघोळे यांनी आदराजंली अर्पण केली. याप्रसंगी राहूल मुंडे, बाळासाहेब केंद्रे, अ‍ॅड. गणपतराव केंद्रे, श्यामराव केंद्रे, डॉ. अशोक केंद्रे, भुजंग मुंडे, संतोष डोंगरे, बालाजी केंद्रे, विठ्ठल केंद्रे, श्रीनिवास केंद्रे, व्यंकटराव केंद्रे, बालाजी डोंगरे आदीसह उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR