चाकूर : प्रतिनिधी
चाकूर तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निवासासाठी इमारत बांधकामासाठी राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यातील हनमंतवाडी येथे मागासवर्गीय मुले आणि मुलींच्या वस्तीगृहाच्या इमारतीसाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या इमारतीचा भूमिपूजन सोहळा सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आज दि १० सप्टेंबर बुधवारी रोजी सकाळी १० वाजता हनमंतवाडी येथे होणार आहे.
अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे हे राहणार असून प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पद्माकर पाटील, नगराध्यक्ष करीमसाब गुळवे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ माने, उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे, नगरसेवक विलासराव पाटील, नगरसेवक मिलिंद महालिंगे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर पवार, यशवंतराव जाधव, सुदर्शन मुंडे, बालाजी सूर्यवंशी, दयानंद सुरवसे,गोविंद भोरे, भानुदास पोटे, अभिमन्यू धोंडगे,भागवत फुले, अनिल वाडकर, शिवदर्शन स्वामी, नितीन रेड्डी, निसार देशमुख, राहुल सुरवसे, मुज्जमिल सय्यद, मोहम्मद सय्यद, राम कसबे, संजय पाटील, पपन कांबळे,नरसिंग गोलावार, मूर्तूजा सय्यद, शिवाजी माने, अर्जुन मद्रेवार, खंडेराव वाघ, संदीप शेटे, मधुकर कांबळे,रणजीत पाटील, सिद्धेश्वर अंकलकोटे, शेषराव मुंजाने, विष्णू तिकटे, शिवशंकर हाळे, विवेक शिंदे, परमेश्वर नवगण, विश्वनाथ एडके, मच्छींद्र नागरगोजे, अंतेश्वर पाटील, भागवत कुसंगे, जगन्नाथ आयनुले, मधुकर मुंडे, मार्शल माने, बाबू दापकेवाले, मन्मथ पालापुरे, बिलाल पठाण हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन हनमंतवाडी- तीर्थवाडी येथील सरपंच हानमंत नरवटे व उपसरपंच राजकुमार शेटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
















