चाकूर येथे स्कूल बस उलटली; घटनास्थळी मुलांचा एकच आक्रोश

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. चाकूर तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी एक स्कूल बस उलटून भीषण अपघात झाला आहे. सांडोळ-महांडोळ मार्गावर ही दुर्घटना घडली असून यामुळे परिसरात काही काळ मोठा आक्रोश बघायला मिळाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चाकूर तालुक्यातील सांडोळ-महांडोळ मार्गावर राचन्नावाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाची स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. यादरम्यान अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा बसमधून सुमारे ३० ते ३५ विद्यार्थी प्रवास करत होते.

बस उलटल्यामुळे बसमधील विद्यार्थ्यांमध्ये मोठी घबराट पसरली. घटनास्थळी एकच आक्रोश ऐकायला आला. या अपघातात अंदाजे २२ ते २३ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. सर्व जखमी विद्यार्थ्यांना तत्काळ उपचारासाठी चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51
Video thumbnail
Nanded|नांदेड पूल कोसळल्याप्रकरणी केंद्रीय पथकाची तपासणी; तांत्रिक त्रुटींचे प्राथमिक संकेत
01:33
Video thumbnail
परभणीत महिला बचत गटांचे आमरण उपोषण; २ महिलांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
01:50
Video thumbnail
Latur|पाऊसानंतर आता गोगलगायींचा कहर; शेतकरी संकटात!
06:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सर्व इमारतींचे तात्काळ फायर ऑडिट; मनपा ॲक्शन मोडवर
02:28
Video thumbnail
Kishor Jadhav Shivnikar Maharaj|पिस्तुल्या शिवणीकर महाराजाला ४ दिवसांची पोलीस कोठडी
02:56
Video thumbnail
Solapur|सांगोल्यात १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त; ३७ हजार लिटर दूध जागेवरच नष्ट
01:42
Video thumbnail
Latur|नागलगाव परिसरातील पाझर तलाव कोरडे, जनावरांवर पाणीटंचाईचे संकट
01:15
Video thumbnail
हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माऊलींच्या पालखीचा दिवे घाटातील विहंगम सोहळा, डोळे दिपवून टाकणारा व्हिडिओ
00:40
Video thumbnail
Parbhani|महेश बिडगर मारहाण प्रकरण; न्यायाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा गंगाखेड बंद, ठिय्या आंदोलन
01:37
Video thumbnail
Latur|११ कार्यालये एकाच छताखाली; लातूरला मिळणार आधुनिक सहकार भवन
08:16

Latest news